Tuesday, July 12, 2022

कलम (३७) अन्वये प्रतिबंधक आदेश लागू

 कलम (३७) अन्वये प्रतिबंधक आदेश लागू

अमरावती, दि. 12 : विविध संस्था, संघटनांकडून पुढील काळात होणा-या आंदोलनाची शक्यता लक्षात घेऊन, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस कायदा कलम (३७) (१) (३) प्रमाणे प्रतिबंधक आदेश १८ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत ग्रामीण भागात लागू करण्यात आला आहे. तशी अधिसूचना प्र. जिल्हा दंडाधिकारी नितीन व्यवहारे यांनी जारी केली.

अधिसूचनेनुसार, जिवितहानी होऊ शकेल असे कुठलेही शस्त्र बाळगणे, विस्फोटक व तत्सम कच्च्या मालाची वाहतूक, दगडविटा आदी क्षेपणास्त्रांचा वापर, जमाव एकत्रीकरण, पुतळ्याचे प्रदर्शन, जाहीररित्या ओरडणे, संगीत वाजवणे, अंगविक्षेप, बीभत्स चाळे, कोणत्याही मेळाव्यास, मिरवणूकीस बंदी घाण्यात आली आहे. हा आदेश शासकीय, निमशासकीय कर्मचारी, लग्न, नाटक, तमाशे, धार्मिक, शासकीय कार्यक्रम, आठवडी बाजाराला लागू नाही. अंत्ययात्रेव्यतिरिक्त अन्य मिरवणूकांसाठी कोणत्याही पोलीस ठाणे अधिका-यांची लेखी परवानगी आवश्यक आहे.

००० 

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...