अमरावतीत आंतरराष्ट्रीय धनुर्विद्यापटू घडताहेत - राष्ट्रीय धनुर्विद्या प्रशिक्षक पवन तांबट

 

अमरावतीत आंतरराष्ट्रीय धनुर्विद्यापटू घडताहेत

-  राष्ट्रीय धनुर्विद्या प्रशिक्षक पवन तांबट

 

अमरावती, दि. 4 : धनुर्विद्या क्रीडा प्रकाराच्या प्रसाराला अमरावतीची क्रीडाभूमी अनुकूल असून, येथील विविध क्रीडा संस्थांच्या प्रशिक्षणातून अनेक धनुर्विद्यापटू घडत आहेत व देशपातळीवर पोहोचत आहेत, असे महसूल सेवेत तलाठी पदावर कार्यरत असलेले, राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक पवन तांबट यांनी आज सांगितले.

 

          श्री. तांबट यांची दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया येथे होणा-या ‘आर्चरी वर्ल्डकपच्या चौथ्या टप्प्यासाठी भारताचे क्रीडा प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे. अमरावतीची मधुरा धामणगावकर ही विद्यार्थिनीही याच स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. श्री. तांबट यांनी यापूर्वी 2016 मध्ये थायलंड येथे ‘आशिया कपमध्ये, तर 2019 मध्ये स्पेनमधील माद्रिद येथे जागतिक युवा धनुर्विद्या स्पर्धेत भारतातर्फे क्रीडा प्रशिक्षक म्हणून सहभाग घेतला आहे. ते महसूल सेवेत तलाठी  पदावर कार्यरत आहेत.

 

अमरावतीतील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातून प्रमोद चांदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण प्रशिक्षण घेतले असून, राष्ट्रीय पातळीवर 14 व राज्यस्तरावर 35 पदके मिळवली आहेत. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळासारख्या नामांकित संस्था, ठिकठिकाणी कार्यरत विविध प्रशिक्षण संस्था, विभागीय क्रीडा संकुल व इतर संकुले यामुळे अमरावतीत धनुर्विद्या क्रीडा प्रसाराला अनुकूल वातावरण आहे. मी स्वत:ही गुरूकुल धनुर्विद्या अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहे, असे श्री. तांबट यांनी सांगितले.

 

            जागतिक स्पर्धेच्या तिस-या टप्प्यात भारताला एक सुवर्णपदक व एक रजतपदक प्राप्त असून, पुढील टप्प्यातही भारत निश्चित प्रथम क्रमांक मिळवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

00000

 

 

 

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती