Friday, July 5, 2019

x











अमरावती, दि. ५ : जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला.

विविध मुद्दे :

प्रशासनाची कार्यक्षमता वाढवणे व झीरो पेंडसी निर्माण करणे यावर भर असेल. 
झीरो बजेट शेतीत उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख जैविक मिशन राबवण्यात येत आहे. त्यात केंद्राकडून सर्वसमावेशक अशी नवी योजना येत आहे. 
पीक कर्ज वितरणात कुठलीही त्रुटी राहू नये याचे निर्देश दिले आहेत.  जिल्ह्यात सध्या २४ टक्के कर्ज वितरण झाले आहे. गती वाढवण्यासाठी मेळावे घेण्याचे निर्देश दिले आहेत. पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहचून बँक नोंदी आदी त्रुटी दूर करण्याची जबाबदारी उप निबंधक यांच्यावर टाकण्यात आली आहे. यानंतरही बँकांनी टाळाटाळ केल्यास कारवाई करू. 
पाच दुष्काळी तालुक्यांसह १९ महसुली मंडळात कर्जाचे पुनर्गठन करण्यात येईल. 
शेतकरी हिताच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. 
सिंचन अनुशेष भरून काढण्यासाठी प्रकल्पांची कामे गतीने राबविण्यात आली आहेत. 
शेतकऱ्याला योग्य भाव मिळण्यासाठी हमी भाव वाढविण्यात आला आहे. 
प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला मिळण्यासाठी शासनाने निर्णय घेतला. इतरही प्रश्नांवर तोडगा काढण्यात येत आहे. 
मेळघाटात आरोग्य सेवा मजबूत करण्यात येईल. शासकीय डॉक्टर यांच्यासह इतर खासगी डॉक्टरच्या सेवा मिळवण्याचा प्रयत्न आहे.
स्थलांतर रोखण्यासाठी रोजगार निर्मिती करण्यात येत आहे.
00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...