Monday, July 8, 2019

सिंचन प्रकल्प परिसरातील गावांबाबत दक्षता बाळगावी - जिल्हाधिकारी शैलेश नवाल



अमरावती, दि. 8 : जिल्ह्यातील सार्वत्रिक पाऊस पाहता सिंचन प्रकल्प परिसरातील गावांबाबत दक्षता बाळगावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी प्रकल्प अभियंत्यां सह संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. 
मोठे, मध्यम व लघु प्रकल्प, गावतलाव आदींच्या पाणीसाठ्यात झालेली वाढ वेळोवेळी तपासावी. परिसरातील गावांची प्रत्यक्ष पाहणी करून तिथे सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल वेळोवेळी सादर करावा, असे निर्देश श्री. नवाल यांनी दिले आहेत. 
या आदेशाची प्रत जिल्हा परिषद, कृषी विभागासह विविध प्रकल्प कार्यालये, पाटबंधारे विभाग आदींना पाठवण्यात आली आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 11-03-2026

  दिव्यांग लाभार्थ्यांच्या मानधनात हजार रुपयांची वाढ; 20 मार्चपूर्वी युडीआयडी आणि आधार अपडेट करण्याचे आवाहन अमरावती, दि. 11 (जिमाका):   राज्...