पालकमंत्र्यांच्या हस्ते निमशहरी पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून ठिबकवर भरघोस अनुदान शाश्वत सिंचनासाठी शासन प्रयत्नरत - पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे









अमरावती, दि. १५ : मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेच्या माध्यमातून ठिबक सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासाठी ठिबक संचाच्या अनुदानात शासनाने वाढ केली असून, पाच एकरांखाली क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना ८० टक्के व त्यावरील शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदान मिळेल. राज्यात  शाश्वत सिंचन निर्मितीचा हा प्रयत्न आहे, असे कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज जुने धामणगाव येथे सांगितले.
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमात १४.३० कोटी रुपये निधीतून धामणगाव रेल्वे तालुक्यातील मौजे जुने धामणगाव येथे निमशहरी पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. आमदार अरुण अडसड, धामणगावचे नगराध्यक्ष प्रताप अडसड, जुने धामणगाव येथील सरपंच जयश्री पोळ आदी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. बोंडे म्हणाले की, ठिबक संचावर पूर्वी पाच एकराखाली ५५ व त्यावर ४५ टक्के अनुदान दिले जात असे. आता त्यात अनुक्रमे २५ व ३० टक्के वाढ केली आहे.  शासनाने पेयजल पुरवठ्यासह संरक्षित सिंचनासाठी अनेक योजना व उपक्रमांना चालना दिली.विविध योजनांतून प्रादेशिक असमतोल कमी करण्यावर शासनाने भर दिला आहे. जिल्ह्यात शेतकरी उत्पादक कंपन्या केवळ १३ आहेत. हे प्रमाण वाढण्याची गरज आहे. अधिकाधिक शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
 शेतकऱ्यांसाठी धामणगाव प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत १९ हजार ६०० नावे अपलोड झाली. उर्वरित कामेही वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
नगराध्यक्ष श्री. अडसड यांनी मनोगत व्यक्त केले. वैभव देशमुख यांनी आभार व्यक्त केले.
00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती