Tuesday, October 4, 2016

केबल जोडण्या संदर्भात विनाक्रम (रॅण्डम)
सर्वेक्षण सोडत दि.1 ऑक्टोबर रोजी
          अमरावती, दि.23 (जिमाका): दि.25 मार्च 2015 रोजीच्या शासन निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्यात केबल जोडण्यांचे संदर्भात विनाक्रम (रॅण्डम) सर्वेक्षण करण्याकरीता प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी सोडत काढून प्रत्येक जिल्ह्यातुन तीन केबल ऑपरेटर व एक बहूविध यंत्रणा परीचालक (एमएसओ) यांची केबल जोडण्यांचे सर्वेक्षणाकरीता निवड करावयाची आहे. याकरीता सोडत क्र. 17 दि.1 ऑक्टोबर 16 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती येथे दुपारी 12.30 वा. सभागृह क्र. 1 मध्ये काढण्यात येणार आहे. या सोडतीकरीता अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा व वाशिम या जिल्ह्यातील सर्व केबल ऑपरेटर व बहूविध यंत्रणा परीचालक (एमएसओ) यांनी उपरोक्त ठिकाणी वेळेवर हजर राहण्याचे आवाहन विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...