Tuesday, October 4, 2016

राज्यस्तरीय शालेय बास्केटबॉल क्रीडास्पर्धेचे
पालकमंत्री पोटे यांच्याहस्ते उद्घाटन

          अमरावती, दि.25 (जिमाका): अमरावती येथील विभागीय क्रीडा संकुल येथे 28 सप्टेंबर 2016 पर्यंत घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय शालेय बास्केटबॉल क्रीडास्पर्धा-2016-17 चे थाटात उद्घाटन पालकमंत्री प्रविण पोटे यांच्या हस्ते झाले. यावेळी ना.पोटे यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
          क्रीडा व युवकसेवा, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी, राज्य बास्केटबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय बास्केटबॉल क्रीडा स्पर्धेस  आ.डॉ.सुनिल देशमुख, आ.डॉ.अनिल बोंडे, जिल्हाधिकारी किरण गिते, शिवछत्रपती पुरस्कार विजेते मुकुंद धस, शत्रुघ्न भोसले, चांदुरकर आदि उपस्थित होते.
          या स्पर्धा 28 सप्टेंबर, 16 चालणार असून राज्यातील नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, मुंबई, नाशिक, कोल्हापूर व पुणे या 8 विभागातील 14,17,19 वर्षे वयोगटातील मुलामुलींचे 48 संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येक संघात 12 खेळाडू असून सुमारे 1 हजार बास्केट बॉलपटू उपस्थित होते. अशी माहिती क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख यांनी प्रास्ताविकात दिली.
          विभागीय क्रीडा संकुल व शिवाजी महाविदयालयात या स्पर्धा होणार आहेत. प्रत्येक गटासाठी निवड समितीचे 3 सदस्य राहणार आहेत. या स्पर्धेतील यशस्वी संघातून राष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धेसाठी 14-17-19 या 3 गटासाठी मुलामुलींचा संघ निवडण्यात येईल. प्रत्येक संघातून प्रथम, द्वितीय, तृतीय अशी निवड करण्यात येईल. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बास्केट बॉल मार्गदर्शक कोच जयंत देशमुख यांच्यासह इतर मार्गदर्शक परिश्रम घेत आहेत अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी यावेळी दिली.
          यावेळी जिल्हाधिकारी किरण गिते यांनीही खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते मुकुंद धस, शत्रुघ्न भोसले, चांदुरकर, नितिन चव्हाण यांचा यावेळी ना. पोटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
          प्रारंभी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केल्या नंतर शिवाजी शिक्षण संस्थेच्या दर्यापूर येथील मुलींनी आकर्षक जिमनॅस्टीक खेळाचे प्रात्यक्षिके सादर केली. त्यानंतर उपस्थित खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी नृत्य सादर केले.

00000








No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...