टेक्स्टाईल पार्कमधील उद्योजकांना सर्व मुलभूत सुविधा
तातडीने पुरवा - पालकमंत्री प्रविण पोटे  
       अमरावती, दि. 23 : अमरावतीच्या नांदगाव पेठ टेक्स्टाईल पार्कमधील उद्योजकांना सर्व मुलभुत सुविधा तातडीने पुरवा असे निर्देश पालकमंत्री प्रविण पोटे यांनी दिले.
          येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ना.पोटे यांच्या अध्यक्षतेखाली टेक्स्टाईल पार्कबाबत आढावा बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्यासह उद्योजक सर्वश्री सियाराम सिल्क मिलचे पवन पोड्डास, पवन बोपचे, गोल्डन फायबरचे अरविंद बियाणी, मोहोड, एनटीसीचे एस.के.शर्मा, राहुल वानखडे, व्हि.एन.पाल, रोहित बग्गा, प्रविण ठोंबरे तसेच एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर, अन्य पदाधिकारी, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी एस.एस.वासनिक, महाव्यवस्थापक पुरी, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे राहुल वानखडे, कौशल्य विकासचे झडके, विद्युत विभागाचे मोहोड तसेच दुरसंचार, एमआयडीसी आदी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
          ना.पोटे यांनी यावेळी उपस्थित सर्व उद्योजकांच्या टेक्स्टाईल पार्कमधील अडिअडचणी समजावून घेतल्या. टेक्स्टाईल पार्कमध्ये पोलिस स्टेशनसाठी गाळा देणे, दुरध्वनी सुविधा, महावितरणचे तक्रार निवारण केंद्र, फायर ब्रिगेड, शहर वातुक, पाणी पुरवठा आदी अडचणी तातडीने सोडविण्यासाठी विद्युत विभाग, एमआयडीसी, पोलिस स्टेशन, दुरसंचार विभाग आदिंनी समन्वयातून उद्योजकांना सुविधा पुरवाव्यात त्यामुळे स्थानिकांना अधिकाअधिक रोजगार प्राप्त होण्यास मदत होईल.
00000

काचावार/गावंडे/सागर/दि.23-07-2016/ 16-40 वाजता



 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती