शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक योजनेसाठी प्रस्ताव आमंत्रित 
       अमरावती, दि.12 : शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिकासाठी सामाजिक न्याय विभागातर्फे प्रस्ताव आमंत्रित करण्यात आले आहे. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, विभाग, कार्यालय यांना प्रोत्साहन देणे या योजनेचा हेतू आहे. पुरस्कारासाठी स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामीण व नागरी), सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करणारे विभाग व शैक्षणिक व सेवाभावी संस्था, सामाजिक न्यायाच्या योजनेला प्रसारित करणारे प्रसार माध्यम हे पात्र ठरू शकतात.
          सन्मानपत्र, स्मृती चिन्ह व रोख एक कोटी रुपये असे पुरस्काराचे स्वरुप असुन हा पुरस्कार दरवर्षी एका संस्थेला दिला जाईल. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, सामाजिक न्याय भवन, चांदुर रेल्वे रोड, अमरावती यांच्याशी संपर्क साधावा. प्रस्ताव टाकण्याची अंतीम तिथी दि.16 जुलै, 16 आहे असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी कळविले आहे.
00000
वृत्त क्र.700                                                         दिनांक 12-7-2016
संत रविदास पुरस्काराकरीता प्रस्ताव आमंत्रित
          अमरावती, दि.12 : चर्मकार समाज व दलित समाजाच्या उद्धारासाठी काम करीत असलेल्या व्यक्ती व सामाजिक संस्थेच्या कामाची दाद घ्यावी यासाठी संत रविदास पुरस्कार व्यक्ती व संस्थांना दिला जातो. पुरस्काराचे निकष पुढीलप्रमाणे.
          व्यक्तीसाठी - समाज कल्याण क्षेत्रात 15 वर्ष कार्य केलेल्या पुरुष, 50 वर्ष अथवा त्यापेक्षा जास्त वय व स्त्री 40 वर्ष अथवा जास्त वयोमर्यादेच्या व्यक्तींनी अर्ज करावे.
          सामाजिक संस्थेसाठी - चर्मकार समाज व दलित समाजाच्या उन्नतीसाठी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था असाव्यात. संस्था 1950 च्या पब्लीक ट्रस्ट ॲक्ट व सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट 1860 खाली पंजीबद्ध असने आवश्यक आहे. संस्थेचे कार्य 10 वर्षाहून अधिक असावे.
          अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, सामाजिक न्याय भवन, चांदुर रेल्वे रोड, अमरावती यांच्याशी संपर्क साधावा. प्रस्ताव टाकण्याची अंतीम तिथी दि.16 जुलै, 16 आहे असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी कळविले आहे.
00000



वृत्त क्र.701                                                         दिनांक 12-7-2016

कलम 144(1) लागु
            अमरावती, दि.12 : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 10वी व 12वी करीता दि.9 जुलै ते दि.3 ऑगस्ट, 16 दरम्यान परिक्षा आहे. त्याकरीता परिक्षाकेंद्रावरील गोंधळ टाळण्यासाठी दि.3 ऑगस्ट, 16 पर्यंत कलम 144(1) नुसार अप्पर जिल्हादंडाधिकारी मोहन पातुरकर यांनी प्रतिबंधक आदेश निर्गमित केले आहे. हे आदेश दि.9 जुलै ते दि.3 ऑगस्ट, 16 दरम्यान ग्रामीण भागातील सर्व परिक्षाकेंद्राच्या परिसरात लागु राहतील.
          या कलमानुसार परिक्षाकेंद्राच्या 100 मीटर परिसरात विद्यार्थी व कर्मचारी या व्यतिरीक्त अन्य कोणालाही प्रवेश करण्यास प्रतिबंध आहे. तसेच 100 मीटरच्या परिसरात व्यक्ती अथवा संस्थेस झेरॉक्स, फॅक्स मशिन, ई-मेल, मोबाईल, कॅलक्युलेटर, बिनतारी संच वापरण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे असे अप्पर जिल्हादंडाधिकारी मोहन पातुरकर यांनी कळविले आहे.
00000
वाघ/गावंडे/दि.12-7-2016/11-30 वाजता


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती