Monday, July 11, 2016

दुरदर्शनच्या ‘जय महाराष्ट्र कार्यक्रमात
अमरावतीचे जिल्हाधिकारी किरण गित्ते
* जलयुक्त शिवार अभियानाच्या पार्श्वभुमिवर
* 12 जुलै ला सायं.7-28 ते 8-10 पर्यंत मुलाखतीचे प्रसारण
        अमरावती, दि. 11 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र कार्यक्रमात अमरावतीचे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून ही मुलाखत मंगळवार दि.12 जुलै, 16 रोजी सायं. 7-28 ते 8-10 या वेळेत प्रसारित होईल. मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांची महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियान ही योजना अमरावती जिल्ह्यात यशस्वी ठरली. या पार्श्वभूमीवर या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.
          जय महाराष्ट्र कार्यक्रमातील या मुलाखतीत जलयुक्त शिवार अभियानाचे अमरावती जिल्ह्यातील यश, शासन स्तरावरील नियोजन, अभियानातील लोकसहभाग, शेतकऱ्यांचे आत्मबल उंचावण्यासाठी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेले नवे प्रकल्प / योजना आदी विषयांची माहिती गित्ते यांनी या मुलाखतीत दिली आहे. सूत्रसंचालक हेमंत बर्वे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
00000

काचावार/गावंडे/दि.11-7-2016/19-15 वाजता

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...