Tuesday, December 5, 2023

एचआईव्ही जनजागृती रॅलीला मान्यवरांनी दाखविली हिरवी झेंडी

 

एचआईव्ही जनजागृती रॅलीला मान्यवरांनी दाखविली हिरवी झेंडी

 

            अमरावती, दि. 5(जिमाका) : एचआईव्ही जनजागृतीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय व विविध सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज रॅलीद्वारे जनजागृती करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.

 

जिल्हा सामान्य रुग्णालय येथून आज सकाळी रॅली सुरु झाली. यामध्ये नर्सिंग इन्स्टिट्यूट जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, डॉ पंजाबराव भाऊसाहेब देशमुख नर्सिंग महाविद्यालय, प्रो. राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनजमेण्ट बडनेरा, श्रीमती विमलाबाई देशमुख महाविद्यालय, शासकीय तंत्र निकेतन, शासकीय औषधी निर्माण शास्त्र महाविद्यालय, समाजकार्य महाविद्यालय बडनेरा, विद्याभारती औषध निर्माण महाविद्यालय, विदर्भ युथ वेलफेअरे औषध निर्माण महाविद्यालय बडनेरा, विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, महात्मा फुले महाविद्यालय भातकुली, गोडे इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी, स्थानिक विविध सामाजिक संघटना व विविध शैक्षणिक संस्थांचे प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने सहभाग घेतला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, डॉ. गोविंद कासट, आयएमएचे अध्यक्ष डॉ. आश्विनीकुमार देशमुख, सचिव डॉ. भूपेश भोंड, स्त्री रोग संघटनेच्या डॉ. सुयोगा पानट, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदिप निरवणे, निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्यसंपर्क डॉ. संदीप हेडाऊ, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे, डॉ. पद्माकर सोमवंशी, डॉ. रघुनाथ वाडेकर, डॉ. संदीप दानखडे, डॉ. अलका कुथे, डॉ श्रीरंग ढोले, डॉ, संध्या खराते, डॉ प्रिती मोरे, डॉ ज्योत्स्ना किटुकाळे तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर्स, स्टाफ नर्स, कर्मचारी व अधिकारी आदी उपस्थित होते.

 

ही रॅली रेल्वे स्टेशन, राजकमल, श्याम चौक, जयस्तंभ चौक, कॉटन मार्केट चौक, इर्विन चौक येथे मार्गस्थ होऊन जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. एचआयव्ही जनजागृतीपर घोषणा देण्यात आले. तसेच विविध संस्थाच्या चित्ररथाव्दारे जनजागृती करण्यात आले. जिल्ह्यातील  जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, जिल्हा क्षय रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय सोबतच 5 उपजिल्हा रुग्णालय, 9 ग्रामीण रुग्णालय, 60 प्राथमिक आरोग्य केंद्र, 70 खाजगी रुग्णालय, 2 लैगिक आजार समुपदेशन व उपचार केंद्र, शासकीय रक्तपेढी, 4 खाजगी रक्तपेढी तसेच सरकार मान्य एच आई व्ही साठी कार्यरत सामाजिक संस्था, अमरावती शहरातील महाविद्यालय, विविध क्लब, विविध संघटना जनजागृती रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

 

 जिल्ह्यात अतिजोखीम गटासाठी विविध संस्था कार्यरत असून यामध्ये स्थलांतरित कामगारासाठी भाग्योदय बहुउदेशीय संस्था अमरावती, गाव पातळीवर लिंक वर्कर कार्यक्रमासाठी तसेच शहरी भागातील देहविक्री करणाऱ्या स्त्रियांसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडल मोझरी, ग्रामीण व शहरी भागातील देहविक्री करणाऱ्या स्त्रियांसाठी सत्यदेव बाबा महिला मंडल मोझरी, ट्रक चालक तसेच वाहक व इतर संलग्नित व्यक्तीसाठी श्री. शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती, तृतीयापंथी, पुरुष व पुरुष यांच्या मध्ये शारीरिक संबंध ठेवणाऱ्या गटाकरिता समर्पण ट्रस्ट अमरावती, एचआईव्ही संक्रमित व्यक्तीचे जीवनमान उंचावण्यासाठी आधार बहुउदशीय संस्थेच्या माध्यमातून या सर्व जोखीम गटाचे समुपदेशन, तपासणी, इतर सुविधाबाबत माहिती या कार्यक्रमाचे प्रकल्प व्यवस्थापक ब्रिजेश दळवी, अंजली देशमुख, राजेंद्र साबळे, राजेश तुपाने, परमेश्वर मेश्राम, आनंद लिल्हारे यांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन उमेश आगरकर व ब्रिजेश दळवी यांनी तर आभार प्रदर्शन अजय साखरे यांनी केले.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...