नझूल पट्टे धारकांनी 31 डिसेंबरपूर्वी कराचा भरणा करावा - भूमी अभिलेख उपअधिक्षक अनिल फुलझेले

 

नझूल पट्टे धारकांनी 31 डिसेंबरपूर्वी कराचा भरणा करावा

                                  -     भूमी अभिलेख उपअधिक्षक अनिल फुलझेले

 

अमरावती, दि. 11 (जिमाका): नझूल पट्टे धारकांनी कर व थकबाकीचा भरणा 31 डिसेंबरपूर्वी करावा, अन्यथा जमीन महसूल अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा भूमी अभिलेख उपअधिक्षक अनिल फुलझेले यांनी दिला आहे.

 

शहरात अनेक नझूल पट्टे धारक आहेत. त्यांनी दरवर्षी कराचा भरणा नियमित करणे आवश्यक आहे. तथापि, नझूल पट्टे धारकांनी एकूण रक्कम 1 कोटी 39 लक्ष 6 हजार 708 रुपयांचा अद्यापही नझूल कर भरलेला नाही.  भूमी अभिलेख कार्यालयाने वारंवार विनंती, सूचना करूनही अनेकांनी कराची रक्कम भरली नाही. या बाबीची गंभीर दखल घेण्यात आली आहे. संबंधित पट्टे धारकांनी 31 डिसेंबरपूर्वी कर न दिल्यास थकित नझूल करवसुलीसाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील तरतुदीनुसार नझूल भाडेपट्टा रद्द करुन नझूल मिळकत शासनजमा करण्याची कार्यवाही करण्याचा इशारा श्री. फुलझेले यांनी दिला आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती