Tuesday, December 5, 2023

महाज्योतीमार्फत विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण

 

महाज्योतीमार्फत विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण

 

 अमरावती, दि. 4 (जिमाका) :  महाज्योतीमार्फत इतर मागास वर्ग, भटक्या विमुक्त जाती, जमाती व विशेष मागास प्रवर्गातील इयत्ता 11 वी सायन्समध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जेईई, नीट व एमएचटी-सीईटी च्या प्रशिक्षणासाठी टॅबचे वितरण करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना टॅब मंजुर झाला आहे त्यांनी कागदपत्रासह मंगळवार, दि. 5 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, अमरावती येथे उपस्थित राहावे, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण माया केदार यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...