Friday, December 8, 2023

 सुधारित वृत्त : 


महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचा अमरावती जिल्हा दौरा


अमरावती, दि. 8 (जिमाका) : महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे हे शनिवार व रविवार दि. 9 व 10 डिसेंबर रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे.


  सकाळी 12 वाजता नागपूर येथून अमरावती येथे आगमन व श्रीमती सुरेखाताई ठाकरे यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट. स्थळ:अप्पू कॉलनी, शेगाव नाका, रहाटगाव रोड, अमरावती.  दुपारी दोन वाजता राज्यपाल रमेश बैस यांच्यासमवेत संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे होणाऱ्या 'राजमाता अहिल्याबाई स्त्री शक्ती पुरस्कार' कार्यक्रमास उपस्थित राहतील. सायंकाळी 4.30 वाजता अंबादेवी दर्शन. सायंकाळी 5 वाजता डफरीन सामान्य रुग्णालय अमरावती येथील वन्स स्टॉप सेंटरला भेट. सायंकाळी 5.30 वाजता देसाई लेआऊट, अमरावती येथील मुलींचे निरीक्षण गृहाला भेट. सायंकाळी 6.30 वाजता श्रीमती सुलभाताई खोडके यांचे निवासस्थानी(गाडगे नगर, अमरावती) सदिच्छा भेट. सायंकाळी 7.30 वाजता गाडगे नगर येथून अमरावती विश्रामगृह येथे आगमन व राखीव.


रविवार दि. 10 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता अमरावती विश्रामगृह येथून वाहनाने आर्वी जि.वर्धाकडे प्रयाण करतील.

00000

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...