‘प्रति थेंब, अधिक पिक’ योजना; अनुसूचित जाती व जमाती शेतकरी लाभार्थ्यांसाठी विशेष मोहिम

 

‘प्रति थेंब, अधिक पिक’ योजना;

अनुसूचित जाती व जमाती शेतकरी लाभार्थ्यांसाठी विशेष मोहिम

 

अमरावती, दि. 15 (जिमाका):   राष्ट्रीय कृषि विकास योजना ‘प्रति थेंब, अधिक पिक’ या योजनेंतर्गत शेतकऱ्यांसाठी ठिबक व तुषार संचाची खरेदी करण्यासाठी अनुदान दिल्या जाते. सद्यास्थितीत उपलब्ध निधीच्या तुलनेत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या अर्जाची संख्या कमी असल्याने या प्रवर्गासाठी दि. 18 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत विशेष पंधरवाडा मोहिम राबविण्यात येत आहे.  अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकरी लाभार्थ्यांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

 

            प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेतंर्गत अल्प व अत्यल्प  लाभार्थ्यांना ठिबक संच, तुषार संच हे  45 टक्के व 55 टक्के या अनुदान दिले जाते. तसेच मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतंर्गत ठिबक सिंच व तुषार संच यांच्या खरेदीसाठी 25 टक्के व 30 टक्के अनुदान दिले जाते. अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन मिशन अंतर्गत अल्प व अत्यल्प लाभार्थ्यांना 35 टक्के पुरक अनुदान व इतर लाभार्थ्यांना 45 टक्के पुरक अनुदान असे एकूण 90 टक्के अनुदान दिल्या जाते. अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना बिरसा मुंडा योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प लाभार्थ्यांना 35 टक्के पुरक अनुदान व इतर लाभार्थ्यांना 45 टक्के पुरक अनुदान असे एकूण 90 टक्के अनुदान दिल्या जाते.

 

 

योजनेंतर्गत ठिबक व तुषार सिंचन संचाचा लाभ घेण्यास इच्छुक शेतकऱ्याकडे मालकी हक्काचा सातबारा, 8 अ व ओलीताची सोय असणे आवश्यक आहे. तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक राहिल.

0000000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती