Official Blogger Account of District Information Office, Amravati DGIPR, Government of Maharashtra
Friday, December 8, 2023
थेट कर्ज योजना; ईश्वर चिठ्ठीव्दारे लाभार्थ्यांची निवड
थेट कर्ज योजना; ईश्वर
चिठ्ठीव्दारे लाभार्थ्यांची निवड
अमरावती, दि. 07 (जिमाका): साहित्यरत्न
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत थेट योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीसाठी
अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार लाभार्थी निवड समितीव्दारे ईश्वर चिठ्ठयाव्दारे
लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येकी 25 पुरुष व महिला
लाभार्थीची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक जे. एम. गाभणे यांनी दिली.
साहित्यरत्न लोकशाहीर
अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत प्रकल्प मर्यादा एक लाख रुपये थेट योजने
अंतर्गत 26 जून ते 1 ऑगस्ट 2023 या दरम्यान कर्जाची मागणी अर्ज स्विकारण्यात आले
होते. या
योजने अंतर्गत एकूण 49 कर्ज मागणी अर्ज तसेच सन 2022-23 या आर्थिक वर्षातील 97
अर्ज असे एकूण 146 लाभार्थी निवड समितीने मान्यता देण्यात आली आहे. त्यामध्ये 115
पुरुष व 31 महिला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार मान्यता
प्राप्त लाभार्थ्यांपैकी 25 पुरुष व 25 महिला लाभार्थीची निवड ईश्वर चिठ्ठयाव्दारे
करण्यात आली आहे.
000000
Subscribe to:
Post Comments (Atom)
DIO NEWS 25-01-2026
मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती, दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...
-
महसूल दिनी एक लाख वृक्षारोपण होणार *आजपासून महसूल सप्ताहाचे आयोजन; विविध कार्यक्रमांची रेलचेल अमरावती, दि. ३१ : महसूल दिनाच्या निमित्ताने १ ...
-
राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत योजना; ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन अमरावती, दि. 12 (जिमाका): राजर्षी शाहू म...
-
शुक्रवारपासून जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शन *लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन अमरावती, दि. 7 (जिमाका) : कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्...
No comments:
Post a Comment