Friday, December 8, 2023

राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते 'राजमाता अहिल्याबाई स्त्री शक्ती पुरस्कार' सोहळयाचे आज उद्घाटन

 राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते 'राजमाता अहिल्याबाई स्त्री शक्ती पुरस्कार' सोहळयाचे आज उद्घाटन

 

अमरावती, दि. 9 (जिमाका) :  राजमाता अहिल्यादेवी फाऊंडेशन अमरावती यांच्या वतीने 'राजमाता अहिल्याबाई स्त्री शक्ती पुरस्कार' सोहळा आज दि. 9 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड अमरावती येथे आयोजित केला आहे. या सोहळयाचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैश यांच्या हस्ते होणार आहे.

 

पुरस्कार सोहळयाला उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, माजी खासदार  पद्मश्री डॉ. विकास महात्मे, आमदार प्रविण पोटे, आमदार ॲड यशोमती ठाकूर, आमदार दत्तामामा भरणे, उपस्थित राहणार आहे. या सोहळ्यात कर्तृत्ववान स्त्रीशक्ती आयएएस विनिता सिंगल, वैशाली माडे, स्नेहल लोंढे, रक्षा पुणेकर, ज्योती देशमुख यांना गौरविण्यात येणार आहे. तरी या प्रेरणादायी कार्यक्रमास महिलांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाव्दारे करण्यात आले आहे.  

00000

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...