Monday, October 1, 2018

पालकमंत्र्यांकडून धान्य खरेदी केंद्राबाबत आढावा खरेदी केंद्र प्रक्रियेला गती द्यावी - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील


            अमरावती, दि.1: मूग, उडीद, सोयाबीन आदी खरेदीसाठी खरेदी विक्री संघांकडून प्रस्ताव प्राप्त करुन घेऊन खरेदी प्रक्रियेला गती द्यावी, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे दिले.
          धान्य खरेदीबाबत आढावा पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला, त्यावेळी ते बोलत होते. आमदार रमेश बुंदिले, जिल्हाधिकारी अभिजीत बांगर, सहकार आयुक्त सतीश सोनी, सहकार उपनिबंधक श्री. जाधव आदी यावेळी उपस्थित होते.
          पालकमंत्र्यांनी यावेळी जिल्हा विपणन अधिकारी व सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन आजच या प्रक्रियेबाबत कार्यवाहीचे निर्देश दिले.
          जिल्हाधिकारी श्री. बांगर म्हणाले की, खरेदी विक्री संघांकडून प्रस्ताव प्राप्त करुन घेऊन आजच सादर करावेत जेणेकरुन तत्काळ मान्यता मिळून कामे मार्गी लागतील. जिल्हा उपनिबंधक व सहकार अधिकाऱ्यांनी या कामाला प्राधान्य द्यावे.
          ऑनलाईन नोंदणीचे काम सुरु करावे व खरेदीच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व कार्यवाही तत्काळ पूर्ण करावी, असे निर्देश श्री. सोनी यांनी दिले.
00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS 25-01-2026

  मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती,   दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...