Tuesday, October 9, 2018

कौशल्य विकास आणि मुद्रा बँकेची सांगड घालून रोजगार मेळाव्यांचे आयोजन करा - सुधीर मुनगंटीवार



मुंबई, दि. 9 : कौशल्य विकास आणि मुद्रा बँकेची सांगड घालून युवकांना स्वयंरोजागरासाठी अधिकाधिक प्रोत्साहित करावेत्यासाठी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करावे अशा सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.
सह्याद्री अतिथीगृहात काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्तीकौशल्य विकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी  उपस्थित होते.
अर्थमंत्र्यांनी राज्यातील सात जिल्ह्याच्या रोजगार संधींचा आढावा घेतला. यामध्ये चंद्रपूरभंडारागोंदियावर्धायवतमाळनागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे.
या जिल्ह्यातील नैसर्गिक विकासाच्या क्षमता आणि त्याअनुषंगाने तिथे सुरु करता येणारे रोजगार यासंबंधी केपीएमजी आणि पीडब्ल्यूसी या कंपन्यांनी त्यांचे सादरीकरण केले. या सात जिल्ह्यात रोजगार संधींची वाढ करतांना ते पर्यावरणस्नेहीभौगोलिक गरजांची पुर्तता करणारे आणि स्थानिकांच्या उत्पन्नात वाढ करणारे असावेतअसे श्री. मुनगंटीवार म्हणाले. या कामाला गती देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
सात जिल्ह्यांमध्ये कृषीपणनवनोपजकृषी प्रक्रिया केंद्रदुग्ध-मत्स्य व्यवसायपर्यटनमाहिती तंत्रज्ञान,  निसर्ग पर्यटन यासह अनेक रोजगार संधी उपलब्ध आहेत. चंद्रपूर येथे फ्लाय ॲशपासून विटा बनवण्याचा उद्योग अधिक वेग घेऊ शकतो. या सर्व क्षेत्रातील रोजगार संधींचा विचार करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानकुशल मनुष्यबळाची आवश्यकता आणि त्यादृष्टीने कौशल्य विकासाची गरज या गोष्टी विचारात घेतल्या जाव्यातनियोजन विभागाने यासाठी समन्वयाने काम करावेरोजगार संधींची उपलब्धता ही कालबद्ध पद्धतीने केली जावीती इतरांना दिशादर्शक असावी असेही अर्थमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...