रा. सु. गवई यांच्या स्मारकाचे काम नियोजित वेळेत पूर्ण करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस





मुंबईदि. 29 : दिवंगत नेते रा. सु. गवई यांचे स्मारक संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परिसरात उभारण्यात येणार आहे. या स्मारकाचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्यात यावे अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाला दिल्या.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली रा. सु. गवई स्मारकासंदर्भातील शिखर समितीची बैठक आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला गृह राज्यमंत्री दीपक केसरकरपर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटीलमुख्य सचिव दिनेश कुमार जैनवित्त व नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव यु.पी.एस. मदानमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशीमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणीनगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासह अमरावती येथून आमदार सुनील देशमुखअमरावती जिल्हयाचे जिल्हाधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगदवारे बैठकीत सहभागी झाले होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेबिहार आणि केरळ राज्याचे माजी राज्यपाल दिवंगत रा. सु. गवई यांचे स्मारक अमरावतीमध्ये उभारण्यात येणार आहे. या स्मारकाचे काम नियोजित वेळेत पूर्ण करताना स्मारकाच्या पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात करण्यात यावी. याशिवाय हे स्मारक संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परिसरात असल्याने स्मारकाच्या देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी अमरावती विद्यापीठाला देण्यात यावी. नियोजित कालमर्यादेत रा. सु. गवई यांच्या स्मारकाची उभारणी राज्य शासनामार्फत करण्यात येणार असून यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.
रा.सु.गवई स्मारक संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरातील मौजा म्हसला येथील ३.९४ हेक्टर जागेत करण्यात येणार आहे. स्मारकस्थळी रा. सु. गवई यांचा पूर्णाकृती पुतळात्यांचा जीवनपट उलगडणारे दालनशैक्षणिकऔद्योगिक व व्यावसायिक दृष्टीने कन्व्हेंशन सेंटरएक हजार व्यक्तींच्या क्षमतेचे मोठे श्रोतागृहदोनशे व्यक्ती क्षमतेचे छोटे श्रोतागृहपरिसंवादासाठी कॉन्फरन्स हॉलखुले थिएटरअतिथीगृह असणार आहे.
0000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती