व्यवसाय सुलभतेमध्ये भारताची 77 व्या स्थानी झेप; मुख्यमंत्र्यांकडून प्रधानमंत्र्यांचे अभिनंदन



          मुंबईदि. 31: जागतिक बँकेने जाहीर केलेल्या व्यवसाय सुलभता (ईझ ऑफ डुईंग बिझनेस) निर्देशांकामध्ये भारताने आजवरचे सर्वोच्च असे 77 वे स्थान गाठले असून या ऐतिहासिक कामगिरीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे तसेच केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली व केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे.
            मुख्यमंत्री अभिनंदन करताना म्हणतात2014 मध्ये भारत जागतिक व्यवसाय सुलभतेमध्ये 142 व्या स्थानी होता. प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने व्यवसाय सुलभता धोरणावर भर देऊन त्याची  यशस्वी अंमलबजावणी केली. याचा परिणाम म्हणून मागील चार वर्षांत भारताने तब्बल 65 स्थानांची झेप घेतली आहे. मागील दोन वर्षांचा विचार केला तर ही झेप 53 स्थानांची (2015 मधील 130 क्रमांकावरुन 77 वर) आहे. तर मागील एका वर्षात 23 स्थानांनी (2017 मध्ये 100 वरुन 77) भारताने आगेकूच केली आहे.
            ही कामगिरी प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या कठोर मेहनतीचे फळ असून ही झेप म्हणजे जागतिक पटलावर भारताने नोंदवलेला मोठा विक्रम आहे. या प्रक्रियेमध्ये महाराष्ट्राचेही लक्षणीय योगदान आहे. देशाचे वित्तीय केंद्र असलेल्या मुंबईतील व्यावसायिक सुलभतेसाठी अनेक निर्णय राज्य सरकारने घेतले. राज्यातील उद्योगांसाठी एक खिडकी योजनेसह परवाना सुलभता आणि अन्य निर्णय घेतल्याने यात सुधारणा झाली. भविष्यात आणखी भरीव योगदान देण्यासाठी  राज्य प्रयत्न करेलअसे आश्वस्त करुन या यशामध्ये वाटा असलेल्या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती