सिडको ने 720 कोटी रु चा चिखलदरा एकात्मिक विकास कार्यक्रम कालबद्धरितीने पूर्ण करावा - सुधीर मुनंगटीवार


 मुंबई, दि. 15 :  प्लॅनिंगक्वॉलिटी आणि स्पीड या  पी.क्यू.एस सूत्राचा उपयोग करून सिडकोने  720 कोटी रु चा चिखलदरा एकात्मिक विकास कार्यक्रम कालबद्धरितीने पूर्ण करावाअसे  निदेश अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.  
आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस  अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटीलखासदार आनंदराव आडसूळआमदार प्रभूदास भिलावेकरनगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीरपर्यटन विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतमसिडको चे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रएम.टी.डी.सी चे व्यवस्थापकीय संचालक सुहास दिवसेअमरावतीचे अतिरिक्त जिल्हाधिकारीजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते
 चिखलदरा हे विदर्भातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असून पर्यटनाच्यादृष्टीने या स्थळाचे विशेष महत्व आहे असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणालेयेथे  वर्षभरात साधारणत: दीड लाखापर्यंत पर्यटक भेट देतात. पर्यटनाच्यादृष्टीने चिखलदऱ्याचे असलेले महत्व लक्षात घेऊन  शहराचा विकास करण्यासाठी सिडको आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त प्रयत्नातून विकास आराखडा राबविला जात आहे. त्यात अनेक विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये पर्यटक निवासनेचल ट्रेलमचानसाहसी क्रीडा संकूल,  तेथील पर्यटन पॉईंटसचा विकासयासारख्या कामांचा समावेश आहे.
 आराखड्यात चिखलदरा येथे मालविय पाँईंट ते भीमकूंड-एनर्जी पॉईंट पर्यंत अंदाजे १.५ कि.मी  लांबीचा आणि खोल दरीतून जाणारा रोप-वेहरीकेत ते शिवसागर पॉईंट पर्यंत ५०० मीटरचा स्काय वॉक देखील प्रस्तावित करण्यात आला आहे.  हे काम पर्यटन विकास महामंडळाकडून करण्यात येणार आहे. या कामासाठी सल्लागार नियुक्त करण्यात येणार असून त्यासाठी लागणारी एक कोटी रुपयांची रक्कम येत्या विधिमंडळ अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून दिली जाईल असे श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले. गावीलगड किल्ल्याच्या पायथ्याशी पर्यटक सुविधा केंद्र बांधण्याचे प्रस्तावित आहे. सर्व व्ह्यू पॉईंटना जोडणारा २७ कि.मी. लांबीचा आणि १२ कि.मी. रुंदीचा गोलमार्गही (रिंगरोड) या आराखड्यात प्रस्तावित करण्यात आला आहे. याच्या भूसंपादनाचे काम सुरु आहे.
 अर्थमंत्री पुढे म्हणाले कीमानव विकास कार्यक्रमांतर्गत चिखलदऱ्याचा समावेश आहे.  येथील मानव विकास निर्देशांक सुधारण्यासाठी शिक्षणआरोग्य आणि दरडोई उत्पन्न यांच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत आहेत.  यातून तिथे रोजगार निर्मितीचे उपक्रम राबविले जावेत, असेही ते म्हणाले.
००००

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती