अन्न व औषध प्रशासनाकडून नियमांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील


       अमरावती, दि.1: शहरात व जिल्ह्यात स्वच्छता आणि आरोग्याचे जतन व्हावे यासाठी ठिकठिकाणी उत्पादित व उपलब्ध खाद्यपदार्थ सुरक्षित असले पाहिजेत. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने कायदे व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे दिले.
            जिल्हाधिकारी कार्यालयात अन्न व औषध प्रशासनाची बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी अभिजीत बांगर, अन्न व औषध सहआयुक्त शशिकांत केकरे, सचिन केदारे, श्री. डांगे आदी उपस्थित होते.
            पालकमंत्री श्री. पोटे पाटील म्हणाले की, शहरातील साथ रोगांच्या पार्श्वभूमीवर शहर पाहणी करुन जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या व त्याबाबत पालिका प्रशासनाला कार्यवाहीचे आदेशही दिले. त्याचप्रमाणे, खाद्यपदार्थ उत्पादक, विक्रेते आदींच्या पदार्थ चाचणी व इतर तपासण्याही काटेकोरपणे झाल्या पाहिजेत जेणेकरुन नागरिकांचे आरोग्य जतन होईल. खाद्य पदार्थांमध्ये केमिकलचा वापर होत असल्याच्याही तक्रारी आहेत. त्यामुळे प्रमाणित चाचण्या व नियमात नमूद घटकांचा समावेश आदींबाबत काटेकोर तपासण्या व्हाव्यात.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती