चुरणीत वैद्यकीय शिबिराचा दीड हजारांवर रूग्णांना लाभ

 चुरणीत वैद्यकीय शिबिराचा दीड हजारांवर रूग्णांना लाभ


 अमरावती, दि. 24 : चिखलदरा तालुक्यातील चुरणी येथील ग्रामीण रुग्णालयात चार दिवसांचे वैद्यकीय व दंतरोग आणि नेत्रतपासणी शिबीर नुकतेच झाले. मेळघाटातील दुर्गम भागातील दीड हजारांवर रूग्णांना त्याचा लाभ झाला.

 

मेळघाटबरोबरच मध्यप्रदेशातील रुग्णांनीही शिबिराचा लाभ घेतला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे यांच्या मार्गदर्शनात शिबीर घेण्यात आले. त्यात 1 हजार 638 रुग्णांची तपासणी करण्यात आली. तपासणीत दंतरोग, स्त्रीरोग, बालरोग, जनरल शस्त्रक्रिया कान, नाक, घसा, अस्थिव्यंग या सर्व प्रकारातील एकूण 80 शस्त्रक्रिया करण्यात आल्या व 5 रुग्णांना पुढील उपचारासाठी मोठ्या रूग्णालयांत संदर्भित करण्यात आले, अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक व नेत्र शल्यचिकित्सक डॉ. रामदेव वर्मा यांनी दिली.


 डॉ. वर्मा यांनी  एक काच बिंदू रूग्ण व 40 संशयित मोतीबिंदू रुग्णांपैकी 29 रुग्णांची निवड करून मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात संदर्भित केले. सामान्य शस्त्रक्रियांमध्ये 30 दंत शस्त्रक्रिया, पाच ऑर्थो, एक गायनिक, एक ऑप्थोल्मिक अशा 43 शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शिबीरात हर्निया, हायड्रोसिल, शरीरावरील विविध प्रकारच्या गाठी आदींवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्याचप्रमाणे, रक्तदाब, रक्तशर्करा आदी तपासणीसह विविध आजारांवर विनामूल्य उपचार करण्यात आले.  


      शिबीरात नेत्र रुग्णांना चष्मे वाटप करून व राष्ट्रीय स्वच्छता अभियानाद्वारे स्वच्छतेचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करून आरोग्याविषयी सूचना देण्यात आल्या. कान, नाक, घसा शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. गवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. पांडुरंग पावडे, अस्थिव्यंग तज्ज्ञ डॉ. संजय पवार व डॉ. प्रविण मुरले, भूलतज्ज्ञ डॉ. भागवणे, डॉ. मनोज इंगळे, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. आश्विनी पटेल, बालरोग तज्ज्ञ डॉ. मालोकर, दंतरोग तज्ज्ञ डॉ. आतिश पवार, डॉ. शिरीष इंगळे, डॉ. पंकज मुळे, गायनिक तज्ज्ञ डॉ. अप्रिम शेख, डॉ. सतीश ठाकरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. दासरवार सर, डॉ. धुर्वे सर, डॉ. लेखिका मॅडम आदींनी शस्त्रक्रियेसाठी योगदान दिले.


नेत्रचिकित्सा अधिकारी आर. एल. फसाटे व श्रीमती स्वाती कुरले यांनी शिबीरामध्ये बहुमूल्य योगदान दिले. शाहिस्ता कुरेशी, प्रेरणा वाडीकर, खीना पाटोरकर, प्रिती भारवे, पुजा, सरोजिनी, नरेंद्र पंडोले, गोविंद पाटील, अमोल बनसोड, श्री. पातोंड, अर्जून टाले, श्री. गोंडाणे, श्री. खंडारे, श्री. गहाणे, श्री. चिमोटे, श्री. अलोकर, निलेश खापरे, श्रीमती रामकली आदी उपस्थित होते.  


00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती