क्षयरोग निर्मूलनासाठी ‘स्टँडर्ड रेजिमन’नुसार उपचार आवश्यक - डॉ. अजय डवले

 क्षयरोग निर्मूलनासाठी ‘स्टँडर्ड रेजिमन’नुसार उपचार आवश्यक

-  डॉ. अजय डवले


अमरावती, दि. 24 : जगात क्षयरोगाने दरवर्षी 16 लाख मृत्यू होतात. त्यातील 25 टक्के मृत्यू भारतात होतात. क्षयरोग निर्मूलनासाठी ‘स्टँडर्ड रेजिमन’नुसार अचूक निदान, तत्काळ उपचार व पाठपुरावा आवश्यक असून, त्यासाठी शासकीय आरोग्य यंत्रणा सतत प्रयत्नरत असते, असे आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. अजय डवले यांनी येथे सांगितले.   


जागतिक क्षयरोग दिनानिमित्त केंद्रातर्फे आयोजित जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, क्षयरूग्णांच्या मृत्यूची भारतातील आकडेवारी चिंताजनक आहे. कोविडकाळात हे प्रमाण आणखी वाढले. क्षयरोगासाठी अचूक उपचारप्रणालीचे पालन होणे आवश्यक असते. अनेकदा तसा औषधोपचार न मिळाल्याने रूग्ण प्रकृतीत सुधारणा होत नाही. शासकीय आरोग्य यंत्रणा तंतोतंत निदान, अचूक उपचार व पाठपुरावा काटेकोरपणे करते. निक्षय मित्र व शासनाला सहकार्य करणा-या स्वयंसेवी संस्थाही रूग्णाला रोगमुक्त करण्यास तत्पर असतात. या यंत्रणेचा लाभ गरजूंना मिळण्यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले.


डॉ. वासनिक यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. आश्लेष पाचघरे, मंगेश पाटणे, श्रीमती बन्सोड, श्रीमती कुटे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आयोजित निबंध स्पर्धेत 30 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. गणेश प्रधान, तारा शर्मा, श्री. मुंद्रे आदी उपस्थित होते. निखिल ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले.


०००

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती