विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019
अमरावती,दि. 11 : प्रसारभारतीचे 'न्यूज ऑन एअर ' या ॲपवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'विशेष निवडणूक वार्तापत्र' दि. 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.25 ते 7. 45 या वेळेत ऐकता येणार आहे. अमरावती आकाशवाणीवरही हे वार्तापत्र प्रसारित केले जाणार आहे.
आकाशवाणीवरील 'दिलखुलास' कार्यक्रमात 'विशेष निवडणूक वार्तापत्र' शनिवार दि. 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.25 ते 7. 45 या वेळेत अमरावतीसह राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर,औरंगाबाद,नाशिक, जळगांव, कोल्हापूर,परभणी, रत्नागिरी, सांगली, अहमदनगर,अकोला, बीड, चंद्रपूर, धुळे, नांदेड, सिंधुदुर्गनगरी, उस्मानाबाद, सातारा, सोलापूर, यवतमाळ या 22 आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित केले जाईल.
No comments:
Post a Comment