दुर्गवाडा, धारवाड्याचा दर्जेदार पुनवर्सन योजनेत समावेश करा - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांचे आदेश

  


           






             निम्न वर्धा पुनर्वसितांना न्याय मिळवून द्यावा
दुर्गवाडा
धारवाड्याचा दर्जेदार पुनवर्सन योजनेत समावेश करा

-         पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांचे आदेश

 

अमरावतीदि. १४ : निम्न वर्धा प्रकल्पाच्या दुर्गवाडाधारवाडा या गावांचा दर्जेदार पुनवर्सन योजनेत समावेश करून तिथे अधिकाधिक  सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज नागपूर येथे दिले.

या गावांच्या पुनवर्सनाबाबत बैठक नागपूर येथील सिंचनभवनात विदर्भ सिंचन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत झालीत्यावेळी त्या बोलत होत्या. व्हीआयडीसीचे राजेंद्र मोहिते यांच्यासह अभियंता अधिकारी उपस्थित होते.

श्रीमती ठाकूर म्हणाल्या कीदुर्गवाडाधारवाड्यात १० वर्षांपूर्वी नागरी सुविधात काही सुविधा झाल्या. मात्र योग्य देखभाल झाली नाही. त्यामुळे या गावांचा दर्जेदार पुनर्वसन योजनेत समावेश करून तिथे आवश्यक सुविधा उभाराव्यात.या दोन्ही गावांत पक्के रस्ते निर्माण करावेत.धारवाडा गावातील पाणी पुरवठा योजना बॅक वॉटरमध्ये असल्याने तिचे स्थलांतर व्हावे. दोन्ही गावांमध्ये शाळासमाजमंदिर परिसराला आवारभिंत बांधून द्यावीदुर्गवाडा येथे स्वतंत्र क्रीडांगणआरोग्य उपकेंद्राची इमारत उभारावीअसे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

 

धारवाडा गावातील नाली ओव्हर फ्लो झाल्याने घरात पाणी शिरते. तिथे तत्काळ संरक्षक भिंत उभारावी. धारवाडा गावासाठी वेगळे ग्रामपंचायत भवन उभारण्यात यावे. श्री क्षेत्र धारेश्वर मंदिर परिसराचा विकास करून तिथे रस्ता व पूल उभारावा. दोन्ही गावांत पथदिवे चांगले नसल्याची स्थानिकांची तक्रार आहे. ते त्वरित बदलून एलईडी लाईट बसविण्यात यावे व रस्त्याच्या कडेला असणारी ११ केव्ही  लाईट तार अंडरग्राऊंड करण्यात यावी. ही कामे तत्काळ पूर्ण करण्यात यावीअसे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

दुर्गवाडा धारवाडा गावातील  संदीप ठाकरे उपसरपंच दुर्गवाडा ग्रामपंचायत सचिन भाऊ सोटेप्रफुलभाऊ धंधर उमेश भाऊ ठाकरे आदी उपस्थित होते

00000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती