Wednesday, May 18, 2022

उद्यमित्रा यात्रा’ शनिवारी अमरावतीत येणार युवकांनी विनामूल्य प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन

 

तरूणांमध्ये उद्यमशीलता वाढविण्यासाठी उपक्रम

उद्यमित्रा यात्रा’ शनिवारी अमरावतीत येणार

युवकांनी विनामूल्य प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन


            अमरावतीदि.18: उद्योजकताकौशल्य विकास आणि प्रशिक्षणाला चालना देण्यासाठी पुण्याच्या युथ एड फौंडेशनच्या सहकार्याने  उद्यमिता यात्रा’ हा राज्यव्यापी उपक्रम हाती घेण्यात आला आहे.  राज्यातील विविध जिल्ह्यांतून उद्यमशीलतेविषयी जनजागृती करत ही यात्रा शनिवारी (21 मे) सकाळी 10 वाजता अमरावतीत बचतभवन येथे दाखल होणार आहे.

                                                तीन दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम

            राज्यभर पुढील 40 दिवस व सुमारे चार हजार किलोमीटरचा प्रवास असे यात्रेचे नियोजन आहे. यात्रेद्वारे अमरावती येथील बचतभवनात 21 ते 23 मे दरम्यान तीन दिवसीय उद्योजकता विनामूल्य प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्यात 40 कुशल प्रशिक्षक युवक-युवतींना उद्योजकतेबद्दल प्रशिक्षण देणार आहेत.  उद्योगाच्या नवनव्या संकल्पना उराशी बाळगणा-या होतकरू विद्यार्थी व युवकांसाठी ही यात्रा मार्गदर्शक ठरणार आहे, असे जिल्हा कौशल्य विकास सहायक आयुक्त  प्रफुल्ल शेळके यांनी सांगितले.

                        युवकांना शासकीय योजनांशी जोडणार

ही यात्रा महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांत फिरून  युवकांना प्रशिक्षित करणार आहे. डिसेंबरअखेर चार हजार सूक्ष्म व्यवसाय सुरू व्हावेत, असे नियोजन आहे. याद्वारे स्टार्टअप, नविन संकल्पनेचा विकास यासंबंधी प्रशिक्षणाबरोबरच उद्योगांसाठीच्या शासकीय योजनांची माहिती देण्यात येईल. प्रशिक्षित युवकांना शासकीय योजनांशी जोडण्याचा प्रयत्नही उपक्रमातून होणार आहे, असे श्री. शेळके यांनी सांगितले.

                        प्रवेशासाठी येथे संपर्क करा

प्रशिक्षण कार्यक्रमासाठी इच्छूकांनी https://forms.gle/or8bgAHJQZDvF25V6 या लिंकच्या माध्यमातून नोंदणी करावी किंवा संस्थेचे समन्वयक चंद्रशेखर डोईफोडे यांच्याशी 8888502835 या क्रमांकावर संपर्क करावा. या विनामूल्य प्रशिक्षणाचा अधिकाधिक युवकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

000

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...