उत्कृष्ट अध्ययन, अध्यायन प्रक्रियेसाठी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ उपयुक्त ठरेल - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

 








शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शुभारंभ

उत्कृष्ट अध्ययन, अध्यायन प्रक्रियेसाठी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ उपयुक्त ठरेल

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

अमरावती, दि. २५ : अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग आवश्यक आहे. त्यादृष्टीने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’, तसेच ‘डेटा सेंटर’ उपयुक्त ठरेल, असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे व्यक्त केला.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात माहिती तंत्रज्ञान विभागात ‘इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्ज’ व उपकरणीकरण विभागात ‘इन्स्ट्रुमेंटेशन ऑटोमेशन अँड कंट्रोल’ ही दोन केंद्रे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ म्हणून स्थापित करण्यात आली आहेत, तसेच ‘डेटा सेंटर’चेही नुतनीकरण करण्यात आले आहे. या केंद्रांचा शुभारंभ श्री. सामंत यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. शिक्षण सहसंचालक डॉ. व्ही. आर. मानकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष महल्ले आदी यावेळी उपस्थित होते.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. सामंत म्हणाले की,  ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’, तसेच ‘डेटा सेंटर’ अधिकाधिक उत्कृष्ट होण्यासाठी राज्यातील इतर संस्थांतील बाबींचा अभ्यास करून त्याचा समावेश करावा. तंत्रशिक्षण समाजाभिमुख व उपयुक्त करण्यावर भर द्यावा, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी मंत्री श्री. सामंत यांनी अध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांशी संवादही साधला.

‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चा उपयोग अध्यापक विकास कार्यक्रम, प्रमाणपत्र कार्यक्रम, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम, संशोधनाचे कार्य करू इच्छिणारे विद्यार्थी, तसेच स्थानिक औद्योगिक प्रकल्पांना सेवा देण्यासाठी होईल, असे प्राचार्य डॉ. महल्ले यांनी सांगितले. कोविडकाळात ‘डेटा सेंटर’चा ग्रामीण विद्यार्थ्यांना अध्यापनात झालेल्या उपयोगाबाबतही त्यांनी माहिती दिली. अणुविद्युत अभियांत्रिकी शाखेचे सहायक प्राध्यापक डॉ. एस. एस. ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले.

 

00000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती