तरूणांमध्ये उद्यमशीलता वाढविण्यासाठी उपक्रम ‘उद्यमिता यात्रे'द्वारे विनामूल्य प्रशिक्षण

 




तरूणांमध्ये उद्यमशीलता वाढविण्यासाठी उपक्रम

उद्यमिता यात्रे'द्वारे विनामूल्य प्रशिक्षण

 

  अमरावती, दि. २२ : युवकांना कौशल्य विकासासह रोजगाराच्या नवनवीन संधींची ओळख करून देणे व त्या मिळवून देण्यासाठी उद्यमिता यात्रा हा उपक्रम सहाय्यभूत ठरेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा यांनी केले.

उद्योजकता, कौशल्य विकास आणि प्रशिक्षणाला चालना देण्यासाठी पुण्याच्या युथ एड फौंडेशनच्या सहकार्याने  उद्यमिता यात्राहा राज्यव्यापी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याच्या जिल्ह्यातील शुभारंभ प्रसंगी बचतभवनातील कार्यक्रमात शनिवारी ते बोलत होते.  जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उदय पुरी, जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी नरेंद्र विसाळे आदी यावेळी उपस्थित होते.

       राज्यभर पुढील 40 दिवस व सुमारे चार हजार किलोमीटरचा प्रवास असे यात्रेचे नियोजन आहे. यात्रेद्वारे  उद्योजकता विनामूल्य प्रशिक्षण कार्यक्रम देण्यात येत आहे. त्यात 40 कुशल प्रशिक्षक युवक-युवतींना उद्योजकतेबद्दल प्रशिक्षण सहभागी असून युवकांचा चांगला प्रतिसाद आहे. उद्योगाच्या नवनव्या संकल्पना उराशी बाळगणा-या होतकरू विद्यार्थी व युवकांसाठी ही यात्रा मार्गदर्शक असल्याचे जिल्हा कौशल्य विकास सहायक आयुक्त  प्रफुल्ल शेळके यांनी सांगितले.

 

 ०००

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती