महाऊर्जा’तर्फे ‘मजीप्रा’च्या पाणीपुरवठा यंत्रणेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प

 महाऊर्जातर्फे ‘मजीप्राच्या पाणीपुरवठा यंत्रणेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प

वीजेत होणार मोठी बचत

अमरावतीदि. 19 : शहराला पाणीपुरवठा करणा-या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मालटेकडीवरील जलशुद्धीकरणतसेच सिंभोरातपोवन आदी केंद्रांवर ‘महाऊर्जातर्फे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या कामाने गती घेतली आहेत्यापैकी तपोवन हेडवर्क्स येथील 365 मेवॅट क्षमतेचा प्रकल्प कार्यान्वित झाला असूनप्राधिकरणाच्या वीज देयकात मोठी बचत होणार आहे.

महाऊर्जातर्फे अमरावती जिल्ह्यात 1 हजार 465 मेवॅट क्षमतेचे तीनयवतमाळ जिल्ह्यात 3 हजार 94 मेवॅट क्षमतेचे सातअकोला जिल्ह्यात 1.4 मेवॅट क्षमतेचे 2 असे एकूण 5 हजार 959 मेवॅट क्षमतेचे सौर वीज प्रकल्प कार्यान्वित आहेत.

शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी साठवणूकवहनशुद्धीकरण करणा-या प्राधिकरणाच्या विविध केंद्रांवर सौर ऊर्जा केंद्रे उभारण्यात येत आहेततपोवन हेडवर्क्स येथे 365 किवॅट येथील प्रकल्प सुरू झाला आहेसिंभोरा हेडवर्क्स येथे 990 किवॅट  मालटेकडी जलशुद्धीकरण केंद्र येथे 110 किवॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प आस्थापित करण्यात आले असूनलवकरच ते कार्यान्वित होतील.

या उपक्रमासाठी ‘महाऊर्जाचे महासंचालक रवींद्र जगतापअतिरिक्त महासंचालक सूरज वाघमारे यांनी मार्गदर्शन केलेअपारंपरिक ऊर्जानिर्मितीच्या या प्रकल्पांमुळे वीजेत बचत होऊन पर्यावरण संवर्धनही साधले जाणार आहेअसे विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे यांनी सांगितले.

000


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती