चिखलदरा पर्यटन महोत्सवात यंदा आठवडाभराची मेजवाणी
* फेब्रुवारीच्या  12 ते 18 दरम्यान होणार महोत्सव
पालकमंत्री प्रविण पोटे यांनी घेतला आढावा
        अमरावती, दि. 03 : चिखलदरा पर्यटन महोत्सव हा तीन दिवसाऐवजी आठवडाभराचा करावा व यामध्ये स्थानिक कलावंताचा सहभाग घ्यावा अश्या सुचना  पालकमंत्री प्रविण पोटे यांनी आज दिल्या. यामुळे पर्यटकांना यावर्षी आठवडाभर सास्कृंतीक कार्यक्रमाची मेजवाणी मिळणार आहे.
               
        जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित चिखलदरा महोत्सवाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार प्रभुदास भिलावेकर , नगर परिषद चिखलदऱ्याचे अध्यक्ष राजेंद्रसिह सोमवंशी,  जिल्हाधिकारी किरण गित्ते,  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण कुळकर्णी  व इतर अधिकारी उपस्थित होते.
            अतिरिक्त जिल्हाधिकारी परदेशी यांनी या पुर्वीच्या झालेल्या बैठकांची माहिती यावेळी दिली.  महोत्सव आयोजनाचा कालावधी 12 ते 18 फेब्रुवारी राहणार असुन पर्यटनमंत्री व इतरांना यासाठी आमंत्रित करण्याचा मानस असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.महोत्सवादरम्यान खादय महोत्सव, साहसी खेळांचे आयेाजन ,मेळघाटातील जैवविविधतेवर आधारीत छायाचित्रप्रदर्शनी समावेश असणार आहे.महोत्सवासाठी निधीची कमतरता पडणार नाही अशी ग्वाही पालकमंत्रयानी दिली.
 गेल्यावर्षी महोत्सवासाठी तयार करण्यात आलेल्या फेसबुक पेजला 75 लाख हिटस मिळाल्या होत्या. यावेळी महोत्सवाची राज्यस्तरावर चांगली प्रसिध्दी करण्याच्या सुचना पालकमंत्रयानी दिल्या.महाराष्ट्र पर्यटन्‍ विकास महामंडळाने पुढाकार  घेउन पर्यटकांना महोत्सवाकडे प्रोत्सहीत करावे अश्या सुचना जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांनी दिल्या.शेगाव , अमरावती, नागपुर या ठिकाणावरुन चिखलदरा येथे येण्यासाठी बसेस उपलब्ध करुन देण्याचाही मुददयावर चर्चा झाली.महोत्सवासाठी वन विभागाची स्वतंत्र बैठक घेण्याचे निर्देश  पालकमंत्रयानी दिले.

00000000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती