विभागीय आयुक्तांनी घेतली पदवीधर उमेदवारांची बैठक

        अमरावती, दि.29 : पदवीधर मतदारसंघासाठी आज निवडणुक निर्णय अधिकारी तथा  विभागीय आयुक्ता जे.पी गुप्ता यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात सर्व उमेदवार व राजकीय पक्षाच्या प्रतिनीधींची बैठक घेतली.       
         या बैठकीला निवडणुक निरीक्षक विकास देशमुख, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक  विभागातील सहाय‍क निवडणुक निर्णय अधिकारी अमरावती जिल्हाधिकारी किरण गित्ते, बुलढाणा जिल्हाधिकारी विकास झाडे, वाशिम जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी, यवतमाळ जिल्हाधिकारी संचिद्रप्रताप सिंग, अधिकारी उपस्थित होते.  
 सहायक निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारांना आज डमी मतपत्रीका उपलब्ध करुन देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. पदवीधर निवडणुकीसाठी उजव्या हाताच्या तर्जनीला शाई लावण्यात येईल.
निवडणुक आयोगाने दिलेल्या परवानगीनुसार मतमोजणीसाठी  14 ऐवजी 30 टेबलवर  होणार असल्याने मतमोजणी वेगात होईल. मतदान केंद्रापासुन 200 मिटर वाहन लावता येणार नाही. राजकीय पक्षांना 200 मिटर परिसराच्या अतंरावरुन  मतदारचिठ्ठी देता येईल. मतदानाच्या दिवशी सकाळी 7 वाजता मतदान प्रतिनिधींना केंद्रावर उपस्थित राहावे. पदवीधर निवडणुकीसाठीचा प्रचार 1 फेबुवारी रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यत करता येईल.
शासकीय कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी नैमीत्तीक रजा  आहे व  खासगी आस्थापनावरील कार्यरत लोकांना मतदानासाठी दोन तीन तासाची मुभा देण्यात येईल. उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनीधीनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आयुक्तांनी दिली. सर्व राजकीय पक्षानी आदर्श आचारसंहीतेचे पालन करुन सहकार्य करावे  असे आवाहनही विभागीय आयुक्तांनी यावेळी केले.

00000
वाघ/सागर/खंडारकर/29-1-2017/15-10 वाजता





Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती