युवा महोत्सवातील चमुंनी देश पातळीवर नाव करावे
पालकमंत्री प्रविण पोटे पाटील

       अमरावती, दि.2 (जिमाका) :  महाराष्ट्राच्या मातीला महानतेची परंपरा आहे. या महानतेचा वारसा सांगत युवा महोत्सवासाठी आलेल्या चमुंनी देश पातळीवर नाव करावे असे आवाहन पालकमंत्री प्रविण पोटे यांनी आज सांस्कृतीक भवनमध्ये आयोजित कार्यक्रमात केले.  जवळपास 20 वर्षानंतर अमरावतीला राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
          यावेळी व्यासपिठावर शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त एम.टी.नाना देशमुख, मनिष गवई, सुचिता बर्वे, मनिष देशमुख, शिक्षण विभागाच्या विशेष कार्याधिकारी कविता नावंदे, उपसंचालक क्रीडा प्रतिभा देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव उपस्थित होते.
          पालकमंत्री प्रविण पोटे म्हणाले की, देशाची वाटचाल जागतिक महासत्तेच्या दिशेने होत आहे. भारताला व महाराष्ट्रालाही चांगल्या खेळाडुंची परंपरा आहे. राज्य शासनाच्या क्रीडा व शिक्षण विभाग विनोदजी तावडे यांच्या नेतृत्वाखाली चांगले कार्यक्रम आखत आहे. या राज्यस्तरातील निवड झालेल्या चमुंनी हरियाणातील राष्ट्रीय युवा महोत्सवात चांगली कामगिरी बजवावी. मी कलेचा जाणकार रसिक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. युवा पुरस्कार प्राप्त मनिष गवई यांनी उपस्थित तरुण, तरुणाईला प्रेरणा देणारे विचार व्यक्त केले.
                 यावेळी अध्यक्षस्थानावरुन नाना देशामुख यांनी खेळाडुना शुभेचछा दिल्या.
          तीन दिवस चालणाऱ्या या युवा महोत्सवमाध्ये लोकनृत्य, लोकगीत, एकांकिका, शास्त्रीय गायन, वकृत्व स्पर्धा आदी कार्यक्रम असणार आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व उपसंचालक क्रीडा विभाग अमरावती यांच्या वतीने आयोजित या युवा महोत्सवाला 25 वर्षाची दिर्घ परंपरा आहे.
                    प्रास्ताविकामध्ये क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख यांनी या युवा महोत्सवासाठी राज्यातून 8 संघ आले असुन युवा महोत्सव हा युवा पिढिला मैत्री, शांती, विकासाकडे नेणारा आहे असे मत व्यक्त केले. यावेळी युवा कल्याण क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारे मनिष देशमुख, मनिष गवई, सुचिता बर्वे यांना पालकमंत्र्यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी गवळण, गणेश वंदना व लावणी या नृत्य प्रकाराचे सादरीकरण पालकमंत्र्यांच्या समोर करण्यात आले.        कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गोपाल उताणे व मंजुषा उताणे यांनी केले.
00000
वाघ/गावंडे/राणे/दि.02-01-2017/17-40 वाजता




Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती