अतिरिक्त मुख्य सचिव सुनिल पोरवाल यांची
धामणगाव रेल्वे कृषि उत्पन्न बाजार समितीस भेट
*शेतमालाच्या ई-टेंडरिंग पद्धतीचा घेतला आढावा
* मुलभूत सुविधा वाढवून कनेक्टिविटीमधील अडचणी समजून घेतल्या

       अमरावती, दि. 3 (जिमाका) : राज्याचे पणन विभागाचे अतिरिक्त मुख्‌य सचिव सुनिल पोरवाल यांनी धामणगाव रेल्वे येथील कृषि उत्पन्न बाजार समितीस भेट देऊन तेथील सोयाबीन ऑनलाईन खरेदी पद्धतीची पाहणी केली. शेतकऱ्यांसाठी मुलभूल सुविधा वाढवून सध्याच्या ईटेंडरिंग मधील कनेक्टीविटी मधील अडचणी समजून घेतल्या. शेतकऱ्यांना जादा भाव मिळावा, व्यापाऱ्यांनाही एकाचवेळी अनेक कृषी उत्पन्न बाजारसमिती मधून शेतमालाची खरेदी व विक्री करता यावी यासाठी मार्गदर्शक सूचना केल्या.

          जिल्हाधिकारी किरण गित्ते व सहनिबंधक दाभेराव, प्रभारी उपनिबंधक श्रीमती के.पी. धोपे, उपनिबंधक राऊत, केमचे (कृषि समृद्धी समन्वयीत कृषि विकास प्रकल्प) प्रकल्प अधिकारी गणेश चौधरी सचिव भिवरकर आदि उपस्थित होते.

          धामणगांव रेल्वे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जी सध्याची व्यवस्था आहे तीच व्यवस्था कायम ठेवून ती ऑनलाईन करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार गतीने होणार आहेत. व्यापाऱ्यांनाही याचा लाभ होणार आहे. या शिवाय प्रत्येक व्यवहारात पारदर्शकता येणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शेतमाल खरेदीसाठी व्यापारांना अनुज्ञप्ती देण्यात आली आहे. येथे येणाऱ्या सर्व शेतमालाची  प्रवेशद्वारावरच नोंदणी केली जातो, शेतकऱ्याचे नाव, शेतमालाचा प्रकार, अंदाजे वजन याची नोंद केल्या जाते. त्यामुळे दिवसभरात किती शेतकऱ्यांच्या किती मालाची आवक झाली याची माहिती जतन केल्या जाते. त्यानंतर सदरचा शेतमाल ई टेंडरींग पद्धतीने व्यापारामार्फत विक्री केला जातो. त्यासाठी लिलाव सभागृह उपलब्ध असून तेथे सर्व संबंधित व्यापाऱ्यांची बोली टॅबवर नोंदविली जाते. ही नोंद मोठ्या स्क्रिनवर सर्व शेतकऱ्यांना दिसते. शेतमालाची अ, ब व क अशी श्रेणी केल्या जाते. श्रेणीनिहाय माल 10 ते 15 व्यापारांना लिलाव करण्यासाठी 20-25 मिनीटांचा अवधी दिल्या जातो. यावेळेतच व्यापारांनी शेतमालाचा भाव नोंदवावा लागतो. ही प्रकिया संपल्यानंतर शेतकऱ्याच्या मालाचे नाव, वजन त्यांना देण्यात येणारी रक्कम याची संगणकीय नोंद केल्या जाते. यासर्व पद्धतीची अतिरिक्त मुख्य सचिव (पणन) यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांना अधिकाधिक मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याच्यादृष्टीने व्यापाऱ्यांशी तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला. ई टेंडरींगमधील कनेक्टीवीटी मध्ये येणाऱ्या अडचणी समजावून घेतल्या. संगणक कक्षातील संगणकावर नोंद झालेल्या शेतमालाची, तारिखनिहाय, शेतमालनिहाय, आवक-जावक ची  तपासणी केली. प्रारंभी सभापती मोहन इंगळे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात सुनिल पोरवाल व जिल्हाधिकारी किरण गित्ते यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार केला.

निंबोळी येथील महिला बचत गटास भेट
          धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंबोळी या गावी केमच्या (कृषि समृद्धी समन्वयीत कृषि विकास प्रकल्प) माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या महिला बचत गटातील महिला सदस्यांशी चर्चा केली.

          तालुक्यातील 10 गावात केम (कृषि समृद्धी समन्वयीत कृषि विकास प्रकल्प) तर्फे  विविध प्रकल्प राबविण्यात येतात. आमच गाव आमचा विकासअंतर्गत निंबोळी येथे सावित्रीबाई फुले महिला बचत गटाकडून शेळीपालन गट चालविण्यात येते. याबचत गटात पूर्वी घेतलेले कर्ज काही कारणामुळ हा गट डबघाईस आला होता. सिएमआरसीकडून 11 महिन्यांसाठी 50 हजार रुपयांचे बिनव्याजाचे कर्ज देण्यात आले . योग्य मार्गदर्शन करण्यात आले. हा प्रकल्प आता भरभराटीस आला आहे. निंबोळी ग्राम पंचायतीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात अतिरिक्त मुख्य सचिव पोरवाल व जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी बचत गटातील सदस्यांशी चर्चा करुन माहिती घेतली.
00000












Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती