मेळघाटातील डिजिटल हरिसाल व्हिलेजमध्ये
मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिययांच्या हस्ते पेटीएम, महा-ई-सेवा केंद्राचा शुभारंभ
·        प्राथमिक आरोग्य केंद्र, कौशल्य विकास,
·        शासकीय आश्रमशाळांना भेट व पाहणी
          अमरावती दि.11- राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिययांच्या हस्ते मेळघाटातील हरिसाल या डिजिटल व्हिलेजमध्ये पेटीएम आणि महा-ई-सेवेचा शुभारंभ आज झाला.
          यावेळी विभागीय आयुक्त जे.पी.गुप्ता, जिल्हाधिकारी किरण गित्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी, आदिवासी विकास विभागाचे अप्पर आदिवासी विकास आयुक्त गिरीष सरोदे, प्रकल्प अधिकारी षण्मुख राजन, आरोग्य संचालक डॉ सतिश पवार, सहसंचालक अर्चना पाटिल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अरुण राऊत,जिल्हा पुरवठा अधिकारी ए.के.वानखेडे, जिल्हापरिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी कैलाश घोडके, जिल्हा आरोग्य अधिकारी भालेराव, कौशल्य विकास विभागाचे उपसंचालक मोहन देशपांडे, फलोत्पादन उपसंचालक प्रिती लोळगे, श्रिया रंगराजन, ह‍रिसालचे सरपंच गणेश येवले, रविंद्र कोल्हे, बंड्या साने, ॲड पोर्णिमा उपाध्याय,आदि मान्यवर उपस्थित होते.
          मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिययांनी हरिसाल डिजिटल व्हिलेज संदर्भात झालेल्या प्रगतीची माहिती घेतली, जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी या संदर्भातील प्रगतीची माहिती दिली. डिजिटल व्हिलेज समिती सदस्यांशी चर्चा केली. पेटीएम कार्यपध्दतीची माहिती घेतली प्रात्यक्षिक दाखवतांना स्मार्ट फोन धारकांनी आपल्या मोबाईलवर पेटीएम ॲप डाऊन लोड करावयाचे आहे. त्यानंतर बार कोड स्कॅन करुन व्यवहाराचे पैसे आपल्या खात्यातून वजा होतात. यासाठी आपल्या मोबाईलवर पेटीएम अकाऊंट असणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत रोकड रहित अर्थव्यवस्था करण्याच्या दृष्टिने जिल्हा प्रशासनाने सुरु केलेला हा उपक्रम अत्यंत स्तूत्य असून नजिकच्या काळात मेळघाटातील बहुतांश गावात डिजिटल पेमेंट शक्य होणार आहे. या कार्यपध्दतीत शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचे लाभार्थीच्या खात्यात पारदर्शक पध्दतीने निधी जमा होणार आहे.
          यावेळी येथे उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सेतु सुविधा केंद्राच्या कार्यपध्दतीची माहिती घेतली या केंद्रात लाभार्थ्यांना विविध 42 प्रकारचे दाखले देण्याची व्यवस्था आहे. यामुळे नागरिकांना सहज आणि सुलभ पध्दतीने दाखले मिळतील. यावेळी स्मार्ट रॅशनकार्ड प्रणालीच्या कार्यपध्दतीची माहिती त्यांनी घेतली. पुरवठा विभागाच्यावतीने या भागात 331 लाभार्थ्यांना स्मार्ट डिजिटल कार्ड देण्यात पुरविण्यात आलेल आहेत या कार्डाशिवाय लाभार्थ्यांना धान्य देण्यात येत नाही. यामुळे गैरप्रकाराला आळा बसेल अशी माहिती पुरवठा अधिकारी वानखेडे यांनी दिली.
          देशातील पहिले डिजिटल व्हिलेज म्हणून हरिसाल या गावाची निवड करण्यात आली आहे. त्या दृष्टिने हरिसाल येथे बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत महा-ई-सेवा सुरु करण्यात आली आहे. मुख्य सचिवांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या हरिसाल शाखेस भेट देऊन तेथील कॅशलेस ट्रॅन्झक्शन सेवेची माहिती घेतली. देशभरात कॅशलेस व्यवहाराचे आवाहन हात असतांना हरिसाल सारख्या दुर्गम आणि अति दुर्गम भागात जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन पॉस सेवा सुरु केली ही बाब अतिशय महत्वाची आहे. पॉस सेवेअंतर्गत बँकेकडून व्यापाऱ्यांना छोट्या पीओएस (पॉईंट ऑफ सर्व्हिस मशिन) पुरविण्यात आल्या आहेत. याद्वारे ग्राहकांना आपल्या आधारकार्ड किंवा एटिएम मशिनद्वारे पैशाचा भरणा करता येतो. न्युमिलन ॲग्रो आणि ब्रँड किराणा स्टोअर्सच्या चालकांना पीओएस मशिन वितरीत करण्यात आली.
          हरिसाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील व्हिजन सेंटर, टेलिमेडिसिन प्रकल्पाची पहाणी केली. या केंद्रात दर बुधवारी विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात येते. तसेच 40 वर्षावरील लोकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात येते गरजुंना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात येते. आतापर्यंत 46 नेत्र रुग्णांना चष्मे वाटप करण्यात आल्याची माहिती डॉ.एस.आय.थोरात यांनी दिली. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व रुग्णांशी संवाद साधला, त्यानंतर मुख्य सचिवांनी कौशल्य विकास विभागाच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या मोफत रोजगारक्ष्म कौशल्य प्रशिक्षण केंद्रास भेट देऊन तेथील उपक्रमाची माहिती घेतली. या केंद्रात मेळघाटातील महिलांना स्वयंरोजगारासाठी विविध प्रकारचे 21 व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येते. उपसंचालक मोहन देशपांडे यांनी माहिती दिली.
          जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभागाच्यावतीने ग्राम बाल विकास केंद्र चालविण्यात येते. मेळघाटातील माता मृत्यू व कूपोषण कमी करण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत शुन्य ते सहा वर्षे वयोगटातील बाळास व त्याच्या आईला पोषण आहार देण्यात येतो. दुसऱ्या टप्प्यात आठवड्यास चार अंडी आणि पोषण आहार देण्यात येत असल्याची माहिती यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी आणि उप मुख्य कार्यकारी अधिकारी कैलाश घोडके यांनी दिली.  या योजनेअंतर्गत 24199 लाभार्थ्यांना लाभ देण्यात येतो. मेळघाटातील कुपोषण थांबविण्यासाठी ग्राम बाल विकास केंद्रात आंगणवाडी ताई कडून पोषण आहार देण्यात येतो. यावेळी अति कुपोषित आणि कमी कुपोषित मुलांच्या वर्गवारी ची माहिती घेतली. यावेळी त्यांनी आंगणवाडीतील मुलांकडून गाणी म्हणून घेतली. मुलांना प्राणी आणि पक्षांची ओळख आहे का नाही हे पहाण्यासाठी त्यांनी मुलांकडून कौतूकाने विचारणा केली.
          कुपोषण मुक्तिसाठी शासन राबविण्यात येत असलेल्या योजनांची फलश्रूती निश्चितपणे मिळत असल्याचे चित्र यावेळी निदर्शनास आले त्याबद्दल त्यांनी संपूर्ण यंत्रणेचे आणि अधिकारी यांच्या कामाविषयी समाधान व्यक्त केले. लोह, आयोडिन, झिंक,  अ जिवनसत्वकमी, पोटातीलजंत, अतिसार, अपूर्णलसीकरण, न्युमोनिया, बाळआहार आणि संगोपनाच्या चुकीच्या पध्दती यामुळे कुपोषण होते अशी माहिती यावेळी मुख्य सचिवांना देण्यात आली. कुपोषण टाळण्यासाठी पोषण आहाराबरोबरच बाळांची नियमितपणे वैद्यकीय तपासणी करण्यात येत असल्याची आरोग्य विभागाने सांगितले.
शासकीय आश्रम शाळेस भेट
          येथील पोस्ट बेसिक शासकीय आश्रमशाळेस तसेच उच्च माध्यमिक आश्रमशाळेस भेट देऊन तेथील सोयी सुविधांची माहिती घेतली. शाळेतील मुलामुलींशी संवाद साधला, येथे निवासी वसतिगृहात जाऊन मुलींना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती घेतली. अप्पर आदिवासी विकास आयुक्त गिरीष सरोदे यांनी मुख्य सचिवांना माहिती दिली.

00000

















Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती