Sunday, January 29, 2017

   चिखलदरा महोत्सव उत्साहात करा
विभागातील प्रत्येक जिल्हयात पर्यटन महोत्सव आयोजित करावा
विभागीय आयुक्त

        अमरावती,दि. 29 : चिखलदरा  महोत्सवाच्या पार्श्वभुमीवर विभागातील अन्य जिलहयांनी पर्यटन महोत्सव आयोजित करावेत अशी सुचना विभागीय आयुक्त जे.पी.गुप्ता यांनी दिल्या. चिखलदरा महोत्सवाच्या आयोजनाचा आढावा घेण्यासाठी आयेजित बैठकीत बोलत होते.           
         या बैठकीला विभागातील अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किरण गित्ते,बुलढाणा जिल्हाधिकारी विकास झाडे,वाशिम जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी,जिल्हाधिकारी यवतमाळ संचिद्रप्रताप सिंग,धारणी उपविभागीय अधिकारी षण्मुखराजन चिखलदरा  नगरपरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले, प्रवीण येवतीकर व इतर अधिकारी उपस्थित होते. अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी यांनी गेल्या बैठकीतील मुद्यांना अनुसरून माहिती दिली.
आयुक्त म्हणाले की पर्यटनवाढीसाठी चिखलदऱ्यांच्या धर्तीवर बुलडाणा जिल्हयात येत्या मार्च महिन्यात लोणार महोत्सव होत आहे. अकोला जिल्ह्यातही नरनाळा महोत्सव असतो.पर्यटन महोत्सवाच्या निमीत्ताने स्थानिक  कलावंताना प्रोत्साहन मिळते.
        चिखलदरा महोत्सवासाठी अंदाजे 50 लक्ष निधी अपेक्षीत असुन जिल्हा नियोजन समिती व न.प. चिखलदरा सिडको महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ या सर्व संस्थानी मिळुन निधी उभारायचा आहे. लोकांना महोत्सवात तीनही दिवस मनोरंजनाचा आंनद घेता आला पाहीजे या दृष्टीने सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करावे. वन विभागाने तसेच छायाचित्रकारांसाठी फोटो प्रदर्शनाचे आयेाजन करावे अश्या सुचना जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिल्यात. पर्यटकांना माकडापासुन संरक्षण देण्यासाठी वनविभागाने ताबडतोब कार्यवाही करावी तसेच वेगवेगळया पॉईटवरील अतीक्रमीत दुकानांना हटवावे अशी सुचना  विभागीय आयुक्तांनी दिली.

00000000

वाघ/सागर/29-1-2017/14-15 वाजता



No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...