Wednesday, January 25, 2017

भारतीय प्रजासत्ताकाचा 67 वा वर्धापन दिन
उत्साहात साजरा
पालकमंत्री प्रविण पोटे यांच्याहस्ते मुख्य शासकीय समारंभात ध्वजारोहण

          अमरावती, दि.26 : भारतीय प्रजासत्ताकाचा 67 वा वर्धापन दिन समारंभ जवाहरलाल नेहरु स्टेडियम येथे उत्साहात साजरा झाला. पालकमंत्री  प्रविण पोटे यांच्याहस्ते मुख्य शासकीय समारंभात सकाळी 9-15 वाजता ध्वजारोहण झाले. ध्वजारोहणानंतर लगेच राष्ट्रगीत झाले त्यानंतर सर्वांनी राष्ट्रध्वजास सलामी दिली.
          यावेळी स्वातंत्र्य संग्राम सैनिक, विभागीय आयुक्त जे.पी. गुप्ता, जिल्हाधिकारी किरण गित्ते, अतिरिक्त विशेष पोलिस महानिरीक्षक विजयसिंह जाधव, पोलिस आयुक्त दत्तात्रय मंडलीक, राज्य राखीव पोलिस बल गटाचे समादेशक जी.बी.डाखोरे, पोलिस अधिक्षक लखमी गौतम, माजी राज्यमंत्री वसुधाताई देशमुख, मनपा आयुक्त हेमंत पवार, प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी जे.एन.आभाळे, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थींनी, वरिष्ठ पत्रकार, जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
          पालकमंत्री प्रविण पोटे यांनी स्वातंत्रसंग्राम सैनिकांना व थोर विभुतींना विनम्र अभिवादन करुन सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
          यावेळी मैदानावरील सर्व उपस्थित पथकाकडून पालकमंत्र्यांना मानवंदना देण्यात आली. पालकमंत्र्यांनी संपुर्ण परेडचे निरीक्षण केले. यामध्ये पोलिस विभाग, राज्य राखीव दल, शहर पोलिस वाहतूक शाखा, स्काऊट गाईड, गृह रक्षक दल तसेच आरोग्य विभाग, वन विभाग, सामाजिक वनीकरण, वन्यजीव विभाग, कुष्ठरोग निर्मुलनासाठीचा आरोग्यरथ, पोलिस विभागाचे श्वान पथक, बँड पथक आदिंनी मानवंदना दिली. शहरातील प्रमुख शाळेतील विद्यार्थी विद्यार्थींनींनी लेझीम, कवायती आदी आकर्षकपणे सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.   
00000

वाघ/बारस्कर/सागर/दि.26-01-2017/11-17 वाजता











No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...