Tuesday, August 14, 2018

केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीचे परिपूर्ण नियोजन १५ दिवसात सादर करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस




मुंबई‍, दि. १४ : ज्या विभागांमार्फत केंद्र पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी होते अशा सर्व विभागांनी त्यांच्याकडे असलेल्या केंद्र पुरस्कृत योजनात्याचा निधी,खर्च आणि भविष्यातील  नियोजन यासंबंधीचा परिपूर्ण आराखडा तयार करून तो १५ दिवसात सादर करावा,  अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशीनियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
केंद्र पुरस्कृत योजनांमधील राज्याला देय असलेला निधी प्राप्त करून घेण्यासाठी  योजनांवर आतापर्यंत झालेल्या खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करणे,उर्वरित निधीची मागणी करणे आणि त्यासाठी पाठपुरावा करणे ही प्रक्रिया विभागांनी वेगाने राबवावी असे सांगून मुख्यमंत्री म्हणालेकेंद्र पुरस्कृत योजनांची ज्या विभागांमार्फत अंमलबजावणी होते त्या विभागाच्या सचिवांनी योजनेचा प्राप्त निधीखर्च याचा नियमित आढावा घ्यावा.
शिष्यवृत्तीमानधन यासारख्या रकमा लाभार्थ्यांच्या खात्यात त्या त्या महिन्याच्या निश्चित तारखेस जमा केल्या जाव्यात अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
०००००

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...