Thursday, August 16, 2018

महान क्रिकेटपटू हरपला : मुख्यमंत्री


 माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर यांच्या निधनाने भारतीय क्रिकेटमधील एक महान व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहेअशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
       मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतातश्री. वाडेकर यांनी खेळाडूकर्णधारप्रशिक्षकव्यवस्थापकनिवड समिती प्रमुख आणि क्रीडा संघटक अशा विविध भूमिकांतून भारतीय क्रिकेटला अतिशय मोलाचे योगदान दिले होते.वेस्ट इंडिज आणि  इंग्लंड  यासारख्या मातब्बर संघांना त्यांच्याच भूमीत प्रथमच  नमविण्याची ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या वाडेकरांनी भारतीय क्रीडा क्षेत्रात विजयाचा एक नवा अध्याय सुरू केला. आक्रमक फलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असलेल्या वाडेकरांनी मुंबई क्रिकेटच्या   विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. क्रिकेटशी असलेली आपली बांधिलकी त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत जोपासली होती.

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...