इंडिया पोस्ट पेमेंट या डिजीटल बॅंकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 21 ऑगस्ट रोजी होणार उद्घाटन


मुंबई,  दि. 14 : महाराष्ट्रात इंडिया पोस्ट पेमेंट या डिजीटल बॅंकेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येथील भारतीय डाक कार्यालयात21 ऑगस्ट रोजी उद्घाटन  होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चीफ पोस्ट जनरल ऑफ महाराष्ट्र एच.सी.अग्रवाल यांनी या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी वर्षा निवासस्थानी आज भेट घेतली.
भारतात पहिल्यांदाच एकाच वेळी 3 हजार 250 डाक कार्यालय (प्रवेश केंद्र) आणि 650 शाखांमध्ये इंडिया पोस्ट पेमेंट या डिजीटल बॅकेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. 
महाराष्ट्र राज्यातील 40 शाखा आणि 200 प्रवेश केंद्राचे एकाच दिवशी उद्घाटन संबंधित क्षेत्रातील लोकप्रतिनिधींच्या हस्ते होणार आहे.
शहरी आणि ग्रामीण भागातील सामान्य नागरिकाला विश्वासू वाटणारीकायम सेवेत उपलब्ध असणारी आणि परवडणारी कॅश लेस असणारी "इंडिया पोस्ट पेमेंट बॅंक" भारतीय डाक कार्यालय नागरिकांसाठी सुरू करीत आहे.
या डिजीटल बॅकेमुळे सामान्यांना कुणाचाही हस्तक्षेप किंवा मदत न घेता आपले खाते सुरू करता येणार आहे. पोस्टमास्तर घरोघरी जाऊन याबाबत सहकार्य करणार आहेत. यामुळे कोणतेही डिजीटल आर्थिक व्यवहारखरेदी -विक्रीलाईट बीलटेलीफोन बील आदींसारखे व्यवहार करता येणार आहे. शासकीय योजनांचे अनुदानही या बॅक खात्यातून प्राप्त होण्याची सोय उपलब्ध होणार आहे.
हा या उप्रकमाचा पहिला टप्पा असून डिसेंबर 2018 पर्यंत 1 लाख 30 हजार डाक कार्यालयात हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. विविध टप्प्यात देशातील एकूण 1 लाख 55 हजार डाक कार्यालयात ही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
यावेळी मुख्य डाक सेवेच्या संचालक सुमिता अयोध्यामुंबई क्षेत्राचे पोस्टमास्टर जनरल गणेश सावळेश्वरकरवरिष्ठ अधिक्षक रूपेश सोनावले उपस्थित होते.
000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती