वांद्रे - वर्सोवा सागरी मार्ग, वाशी खाडीवरील पुलाचे बांधकाम एक महिन्यात सुरु करा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


 मुंबईदि. 29 : वांद्रे ते वर्सोवा सागरी मार्ग प्रकल्पपुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील नवीन मार्गिकेचे (Missing Link) बांधकामसायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडीवर वाशी येथे तिसऱ्या पुलाच्या बांधकामास आज झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देऊन एक महिन्याच्या आत बांधकामास सुरुवात कराअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक झाली. या बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटीलजलसंपदा मंत्री गिरीश महाजनजलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदेसार्वजनिक बांधकाम (सार्व. उपक्रम) राज्यमंत्री मदन येरावारमुख्य सचिव दिनेश कुमार जैनमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशीप्रधान सचिव भूषण गगराणीवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यू.पी.एस. मदाननियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्तीसार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक,महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
वांद्रे ते वर्सोवा सागरी मार्ग
वांद्रे ते वर्सोवा हा सागरी सेतू सध्याच्या वांद्रे-वरळी समुद्र सेतूच्या तीन पटीने जास्त लांब असणार आहे. या नवीन सागरी सेतूपासून पश्चिम द्रुतगती मार्गास जोडणारी वाहतूक व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच वांद्रे बस स्थानकावरुन जोडणारा नवीन रस्ता पश्चिम द्रुतगती मार्गावरुन (पार्ले जंक्शन) वर्सोवा नाना नानी पार्क येथे सागरी सेतूला जोडणारा रस्ता विकसित करण्यात येणार आहे.
वाशी येथे तिसऱ्या पुलाचे बांधकाम
ठाणे खाडीवर वाशी येथे तिसऱ्या पुलाच्या बांधकामास मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पामध्ये वाशी येथील टोलनाक्याचे विस्तारीकरण व आधुनिकीकरण करुन वाहतूक सुरळीत करण्यात येणार आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील नवीन मार्गिका
खोपोली ते खंडाळा या घाट लांबीतील नवीन मार्गिकेचे (Missing Link) बांधकाम करण्यात येणार आहे. खालापूर टोल नाक्यापासून कुसगाव (सिंहगड इन्स्टिट्यूट) येथे निघणारा दोन टप्प्यातील बोगद्यांचे व त्यांना जोडणाऱ्या आधुनिक पुलाचे बांधकाम करण्यास मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पातील दोन बोगद्यांची एकूण लांबी 11 कि.मी. असून दोन डोंगरामधील पुलांची लांबी दोन कि.मी. आहे. देशातील सर्वात मोठा असा 650 मीटरच केबल स्टेड पूल पर्यटकांसाठी आकर्षक असणार आहे. यामुळे पुणे-मुंबई मार्गावरील वाहतुकीचे अंतर कमी होऊन वेळेची बचत होण्यास मदत होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती