Tuesday, August 14, 2018

महाराष्ट्रातील शहरे उत्तम राहण्यायोग्य मानांकनात देशात अव्वल नागरिकांसह संस्था-यंत्रणांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन



मुंबईदि. 13 : देशातील उत्तम राहण्यायोग्य शहरांच्या निर्देशांकात महाराष्ट्रातील शहरांनी बजावलेल्या चमकदार कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला असून या शहरांमधील नागरिकांसह संबंधित संस्था-यंत्रणांचे त्यांनी अभिनंदन केले आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या राष्ट्रीय पातळीवरील या मानांकनात पुणे अव्वल ठरले असून नवी मुंबई दुसऱ्या तर मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे.
देशातील १११ शहरांची राहण्यायोग्य उत्तम शहर या मानांकनासाठी विचार करण्यात आला होता. नागरिकांसाठी उत्तम राहण्यायोग्य शहरांच्या निर्देशांकात (Ease of Living Index - 2018) राज्यातील १२ शहरांनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे या यादीतील पहिल्या दहांमध्ये राज्यातील एकूण ४ शहरांचा समावेश असून पहिले तिन्ही क्रमांक राज्यातील शहरांनी पटकावले आहेत. तसेच पहिल्या पंचवीसमध्ये ८ शहरांनी स्थान मिळवले आहे. त्यात पहिल्या तीन क्रमांकासह ठाणे (सहा)अमरावती (सोळा)वसई- विरार (वीस)नाशिक (एकवीस)सोलापूर (बावीस) या शहरांचा समावेश आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाने देशातील उत्तम राहण्यायोग्य असलेल्या शहरांची ही यादी जाहीर केली आहे. संस्था आणि प्रशासनसामाजिक पायाभूत सुविधाशिक्षण आणि आरोग्यत्याचबरोबर आर्थिक घटक आदी मानकांचा विचार करून ही यादी तयार करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...