मंत्रिमंडळ निर्णय : बॉम्बे पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या नावात आता बॉम्बेऐवजी मुंबईच्या समावेशास मान्यता


मुंबईतील बॉम्बे पशुवैद्यकीय महाविद्यालय बॉम्बे (Bombay Veterinary college, Bombay) या महाविद्यालयाचे नाव बदलून मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयमुंबई  (Mumbai Veterinary college, Mumbai) असे करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
केंद्र शासनाने 15 डिसेंबर 1995 मध्ये इंग्रजीतील बॉम्बे आणि हिंदीमधील बम्बई या शब्दांऐवजी सर्व भाषेत मुंबई असेच लिहिण्यात यावे असा निर्णय घेतला. त्यावेळी दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या या महाविद्यालयाच्या नावाबाबत विचार करण्यासंदर्भात एक समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने बॉम्बे नावाने महाविद्यालय ओळखले जात असल्याने इंग्रजीमध्ये Bombay Veterinary college, Parel, Mumbai असे तर मराठीत पशुवैद्यकीय महाविद्यालय परळमुंबई असे करण्यात यावा असा निर्णय घेतला. त्यानंतर 1 एप्रिल 2001 पासून शासनाने निर्माण केलेल्या नागपूर येथील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत हे महाविद्यालय कार्यरत झाल्यानंतर विद्यापीठाने Bombay Veterinary college, Mumbai या महाविद्यालयाचे नाव Mumbai Veterinary college, Mumbai असे करण्याचा ठराव मंजूर केला. राज्य शासनाच्या विधि व न्याय विभागाच्या 1996 च्या अधिनियमानुसार महाविद्यालयाच्या नाव बदलाचा विद्यापीठाचा ठराव मंत्रिमंडळापुढे सादर करणे आवश्यक होते. त्यानुसार आज या महाविद्यालयाचे नाव बदलण्यासंदर्भातील विधेयकाच्या मसुद्यास मान्यता देण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती