Wednesday, August 29, 2018

मंत्रिमंडळ निर्णय : जळगावमधील तीन तर औरंगाबादमधील एकाचा समावेश चार पाझर तलावांच्या योजनांना प्रशासकीय मान्यता


            जळगाव जिल्ह्यातील तीन तर औरंगाबाद जिल्ह्यातील एक अशा एकूण चार पाझर तलावांच्या कामास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या भागातील ही कामे मार्गी लागून पाणी उपलब्ध होण्याबरोबरच शेतकऱ्यांचा आर्थिक व सामाजिक स्तर उंचावण्यास मदत होणार आहे.
            जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील लिहे तांडा 1सामरोदगोदेगाव  आणि औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील लिहे तांडा 2 या पाझर तलावांची कामे सध्याच्या आर्थिक निकषात बसत नसल्यामुळे प्रलंबित होती. या तलावांची उपयुक्तता पाहता त्यांना मंजुरी देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाने घेतला. या चारही योजनांसाठी एकूण 16 कोटी 2 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

No comments:

Post a Comment

DIO NEWS 25-01-2026

  मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती,   दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...