मुख्यमंत्र्यांनी घेतला गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी प्रशासन व गणेश मंडळांनी समन्वय राखावा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



            मुंबईदि. 30 : न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून राज्यातील गणेशोत्सव अतिशय उत्साहात व आनंदात साजरा करण्यासाठी प्रशासन व गणेश मंडळांनी उत्तम समन्वय राखावाअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.  
                 गणेशोत्सवाच्या आयोजनासंदर्भात आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात प्रशासन व समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी त्यांनी सूचना दिल्या. मुंबई शहराचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री सुभाष देसाईमुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडेगृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर,बृहन्मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वरपुण्याच्या महापौर मुक्ता टिळकआमदार आशिष शेलारगृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवालबृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहतापोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकरमुंबई पोलीस आयुक्त सुबोध जयस्वालबृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेंद्र दहीबावकरप्रमुख कार्यवाह गिरीश वालावलकरसार्वजनिक गणेशोत्सव महासंघाचे अध्यक्ष जयेंद्र साळगावकर आदी उपस्थित होते. यावेळी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने तयार केलेल्या माहिती पुस्तिकेचे अनावरण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले
            मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेमुंबईतील गणेशोत्सव हा जागतिक आकर्षणाचे केंद्र आहे. येथील गणेशोत्सव पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात परदेशी पर्यटक येत असतात. त्यामुळे हा अतिशय उत्सव आनंदात साजरा होण्यासाठी व गणेश मंडळाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन व मंडळांनी समन्वय साधावा. पोलीस व प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार योग्य ती अंमलबजावणी करावी. समन्वय समितीच्या मागण्यासंदर्भात प्रशासनास योग्य ते निर्देश देण्यात आले आहेत.
            मुंबईतील गणेशोत्सव मंडळांना ऑनलाईन परवाना देण्यात येत आहेत. यावर्षी कागदपत्रे जमा केल्यानंतर व ऑनलाईन माहिती भरल्यानंतर पुढील वर्षी पुन्हा कागदपत्रे देण्याची आवश्यकता भासणार नाहीअशी व्यवस्था करण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
०००

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती