रेल्वे प्रकल्पाबाबतची आढावा बैठक रेल्वे प्रकल्पांची कामे तातडीने पूर्ण करा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



मुंबई, दि. 23 : रेल्वे मंत्रालयाने राज्यातील अनेक प्रकल्पांना मंजूरी दिली असून त्यासाठीची भूसंपादन प्रक्रिया, नव्याने रेल्वे लाईन टाकण्याची कामे आणि रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांसाठीच्या सोयीसुविधांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.
मलबार हिल परिसरातील सह्याद्री राज्य अतिथीगृहात राज्यात सुरु असलेल्या विविध रेल्वे प्रकल्पांबाबत आढावा बैठक आज झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या बैठकीला केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेराज्यातील अनेक मार्गावर नव्याने रेल्वे लाईन टाकण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. त्यासाठी सिडकोमुंबई विकास प्राधिकरण आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळाने हा प्रश्न निकाली काढावा. सीएसटी- पनवेलचर्चगेट-विरार कॉरिडॉर मार्गविविध स्थानकांतील इलेव्हेटडे कॉरिडॉरची कामेहायस्पिड रेल्वेओव्हर ब्रिजेसरेल्वे स्टेशनवरील सोयीसुविधा तसेच इन्टीग्रेटेड टिकेटिंग सिस्टिम सुरु करण्यासंदर्भात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकांऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
याच आढावा बैठकीत मुंबई रेल्वे विकास महामंडळाने सादर केलेल्या सादरीकरणातून मुंबई शहर व परिसरातील सुरु असलेल्या प्रकल्पांची माहिती देण्यात आली. या प्रत्येक प्रकल्पांच्या सद्यस्थितीची माहिती रेल्वेमंत्री पियुष  गोयल यांनी घेतली व चालू वर्षासाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद केलेले प्रकलप पूर्णत्वास नेण्याच्या सूचना त्यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या.
अहमदनगर-बीड-परळीवैजनाथवर्धा-बल्लारशाहकल्याण-कसाराभुसावळ-जळगावपुणे-मिरज लोणावळामनमाडजळगाववर्धा-नागपूरगोरेगाव बोरिवलीबोरिवली-विरारकल्याण-आसनगांव कल्याण-बदलापूरपनवेल-कर्जतरोहा-वीर या मार्गावर दुसरी  आणि तिसरी रेल्वे लाईन टाकणे तसेच बेलापूर-सीवूड-उरण या नव्या रेल्वे कामाबाबतचे भूसंपादनपनवेल-कळंबोली कोचिंग टर्मिनन्स आणि खारकोपर-उरण या 14.5 किलो मीटरच्या लांबीसाठी भूसंपादनाबाबत चर्चा करण्यात आली.
या बैठकीला मुख्य सचिव दिनेश कुमार जैनवित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव यु पी एस मदान अप्पर मुख्य सचिव प्रविण परदेशीमुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता तसेच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती