Thursday, October 14, 2021

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांनापालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप


राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना
पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप

            अमरावती, दि. 14 : राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप आज करण्यात आले.
            शासकीय विश्रामगृह येथे हा कार्यक्रम झाला. उपविभागीय अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे व इतर अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.गरीब कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियास या योजनेद्वारे सहाय्य दिले जाते. गरीब व वंचित घटकांच्या मदतीसाठी केंद्र व राज्य शासनाच्या सहाय्य योजनांचा लाभ सर्व गरजू व्यक्तींना द्यावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
          उमरापूर येथील सविता तसरे, निमखेडा येथील नलू महिंगे, वाठोडा शुक्लेश्वर येथील मायावती समदुरे, रिजवाना बी एहसानोद्दीन, निरुळ गंगामाई येथील रेखा पाडर, तसेच साऊर येथील रंजना गजभिये आदींना यावेळी धनादेशाचे वाटप करण्यात आले.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...