मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत झुंज येथील दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबियांना अर्थसाह्य वितरीत पालकमंत्र्यांचा पाठपुरावा

 



मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत

झुंज येथील दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबियांना अर्थसाह्य वितरीत

पालकमंत्र्यांचा पाठपुरावा

 

अमरावती, दि. 22 : झुंज येथील दुर्घटनाग्रस्त  व्यक्तींच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी दोन लाख रूपये अर्थसाह्य देण्याची तरतूद करण्यात आली. पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या पाठपुराव्याने हा  निधी तत्काळ प्राप्त होऊन वरूड तालुक्यातील 6 दुर्घटनाग्रस्त व्यक्तींच्या कुटुंबियांना अर्थसाह्य वितरित करण्यात आले आहे.   

 

वरूड तालुक्यातील मौजे वघाळ शिवारातील झुंज या ठिकाणी वर्धा नदीपात्रात दि. 14 सप्टेंबरला बोट बुडाल्यामुळे बोटीतील 11 व्यक्तींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची तत्काळ दखल घेत पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे विनंती व पाठपुरावा केला. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विशेष बाब म्हणून 11 व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख याप्रमाणे एकूण 22 लाख रूपये अर्थसाह्य मंजूर केले. पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याने ही रक्कम जिल्हा प्रशासनाकडे तत्काळ प्राप्त झाली. त्यानुसार अर्थसाह्याची रक्कम वरूड तालुक्यातील 6 दुर्घटनाग्रस्त व्यक्तींच्या कुटुंबांना वितरित करण्यात आली आहे, अशी माहिती वरूड तहसील कार्यालयातर्फे देण्यात आली.  

 

आपद्गग्रस्तांचे दु:ख जाणून त्यांना तातडीची मदत मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे.  दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना मदत तातडीने मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी तत्काळ मान्यता दिली व निधी जिल्ह्याकडे वर्गही करण्यात आला. ही कार्यवाही गतीने पूर्ण करण्यात आली. शासन आपद्गग्रस्त कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिली.  

                                    000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती