शिकस्त शाळा, इमारतीच्या तक्रांरीसाठी नियंत्रण कक्ष स्थापन

 


 शिकस्त शाळा, इमारतीच्या तक्रारींसाठी नियंत्रण कक्ष स्थापन

 

     अमरावती दि. 20 : सद्यस्थितीत जिल्‍ह्यामध्‍ये हलका ते मध्‍यम स्‍वरुपाचा पाऊस सुरु आहे. पुढील काही दिवसांमध्‍ये जिल्‍ह्यामध्‍ये जोरदार अतिवृष्‍टी होण्‍याबाबत हवामान विभागाद्वारे अंदाज व्‍यक्‍त करण्‍यात आलेला आहे. जिल्‍हा परिषद अंतर्गत शिकस्‍त शाळा, धोकादायक इमारती संदर्भात जिल्‍हा व तालुकास्‍तरीय संबंधित अधिकारी यांना यापूर्वीच अशा शाळा खोल्‍या व इमारतींचे निरिक्षण व पाहणी करुन नियमानुसार निर्लेखित करण्‍याबाबत प्रशासकीय स्‍तरावरुन कार्यवाही सुरु आहे. 

 

     अशा शाळा खोल्‍या, इमारतींमधील विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी यांची इतर सुरक्षित इमारतींमध्‍ये पर्यायी व्‍यवस्‍था उपाययोजना करण्‍यात आलेली आहे. कोणत्‍याही परिस्थितीमध्‍ये धोकादायक शाळा खोल्‍या व इमारतींमध्‍ये विद्यार्थ्‍यांना ब‍सविल्‍या जात नसल्‍याची खात्री करण्‍यात आली आहे. नागरिकांची काही तक्रार, सूचना असल्‍यास याबाबत जिल्हा स्तरावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अध्‍यक्षतेखाली एक ‘नियंत्रण कक्ष’ स्थापन करण्यात आलेला आहे. यामध्ये धोकादायक शाळा, इमारत बाबत काही सूचना असल्यास किंवा मदतीची गरज असल्यास नागरिकांनी 0721-2666261 किंवा 0721-2662926 या दूरध्वनीवर संपर्क करण्‍याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.

 

00000

 

 

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती